खराब हवामानामुळे शुभांशू शुक्ला यांचे उड्डाण पुढे ढकलले, आता ११ जूनला होणार Axiom-4 मिशनचे लाँचिंग

नवी दिल्ली: भारताच्या हवाई दलाचे पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठीचे मिशन Axiom-4 हे पुढे ढकलण्यात आले आहे. खराब हवामानामुळे हे लाँचिंग पुढे ढकलण्यात आले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्त्रो)ने ही माहिती आपल्या अधिकृत एक्स वर पोस्ट करत दिली आहे.


इस्त्रोचे प्रमुख डॉ. व्ही. नारायणन यांच्या हवाल्याने एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले, खराब हवामानामुळे भारताचे गगनप्रवासी यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवण्यासाठीचे Axiom-4 चे लाँचिंग १० जूनच्या ऐवजी ११ जूनला केले जाणार आहे. लाँचिंगची पुढील वेळ ११ जूनला संध्याकाळी ५.३० वाजता आहे.


 


भारतीय हवाई दलाचे पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला तीन इतर क्रू मेंबर्ससोबत स्पेस मिशन, Axiom-4 चा भाग बनण्यासाठी तयार आहे. हे मिशन म्हणजे भारतासाठी एक मैलाचा दगड ठरेल. Axiom-4मिशनची क्रू आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा प्रवास करणार आहे. १४ दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे. यात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील वैज्ञानिक प्रयोग, शैक्षणिक प्रसार आणि व्यावसायिक उपक्रमांबाबत संशोधन होणार आहे.


मिशन अ‍ॅक्सिओम स्पेसच्या 'Axiom-4' मोहिमेअंतर्गत लाँच केले जाईल. ज्याला 'मिशन आकाश गंगा' असेही म्हटले जात आहे. Axiom-4 (अ‍ॅक्स-४) मध्ये,चार देशांचे चार अंतराळवीर १४ दिवसांसाठी अंतराळ स्थानकात जाणार आहेत.शुभांशू हे आयएसएसमध्ये जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील. यापूर्वी राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळ यानातून अंतराळात प्रवास केला होता.


Axiom-4 मोहिमेच्या क्रूमध्ये भारत, पोलंड आणि हंगेरीतील सदस्यांचा समावेश आहे. १९७८ नंतर अंतराळात जाणारे स्लावोज उझनान्स्की हे पोलंडमधील दुसरे अंतराळवीर असतील. १९८० नंतर अंतराळात जाणारे टिबोर कापू हे हंगेरीचे दुसरे अंतराळवीर असतील. तर अमेरिकेच्या पेगी व्हिटसनची ही दुसरी व्यावसायिक मानवी अंतराळ उड्डाण मोहीम आहे.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या