Share Market Morning News: बाजार सुसाट सकाळीच सेन्सेक्स ३२२.८४ व निफ्टी १०९.३५ अंशाने वधारला

  71

प्रतिनिधी: आज इक्विटी बेंचमार्क सकाळच्या सत्रात बाजाराने जबरदस्त सुरूवात केली आहे. आरबीआयने रेपो दरात कपात केल्यानंतर प्रथमदर्शनी आजही ही बाजाराची विजयी घोडदौड कायम राहिल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सकाळच्या सत्रात गिफ्ट निफ्टीमध्ये ०.१२ टक्क्याने वाढ झाल्यानंतर बाजारात सुरूवात सकारात्मक निर्देशांकात होईल असे वाटले होते. नेमके तसेच झाले आहे. आज बाजारात सकाळी सत्र सुरु होतानाच सेन्सेक्स (Sensex) ३२२.८४ अंशाने वाढत ८२५११.८३ पातळीवर तर निफ्टी ५० (Nifty 50) निर्देशांकात १०९.३५ अंशाने वाढ होत २५११२.४० पातळीवर पोहोचला आहे.

सेन्सेक्स बँक निर्देशांकात लक्षणीय वाढ झाली आहे. थेट ५१०.६४ अंशाने वाढ झाल्यानंतर सेन्सेक्स ६४०६७.०० पातळीवर पोहोचला जवळपास ०.८० टक्क्याने सेन्सेक्स बँक निर्देशांकात वाढ झाली असून निफ्टी बँक निर्देशांक २५४.५० अंशाने वाढ होत ५६८०३.७० पातळीवर पोहोचला आहे म्हणजेच निफ्टी बँक निर्देशांक ०.४० टक्क्याने वाढला आहे. रेपो दरात झालेली कपात व सरकारी पीएसयु बँकांच्या नफ्यात झालेल्या वाढीचा फायदा या समभागांना (Shares) मिळाला आहे. बीएसई (BSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६६%, ०.५०% वाढ तर एनएसई (NSE) मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकात अनुक्रमे ०.९९% व ०.७४% वाढ झाली.

सकाळी सुरुवातीला कल्पतरू प्रॉपर्टी (५.६७%), गोदरेज एग्रोवेट (४.८७%), अपार इंडस (४.१५%), बजाज फायनान्स (३.९७%), होंडाई मोटर्स (३.९२%), श्रीराम फायनान्स (३.६७%), चोलामंडलम फायनान्स (१.७१%), जेएसबब्लू एनर्जी (१.४५%), एक्सिस बँक (१.२८%), पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (१.२५%), कोटक महिंद्रा (१.०५%) या समभागात वाढ झाली असून सर्वाधिक नुकसान स्विगी (३.०२%), भारती एअरटेल (०.८०%), आयसीआयसीआय बँक (०.३०%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (०.१७%), अपोलो हॉस्पिटल (०.११%), कोचीन शिपयार्ड (२.८९%), रामकृष्ण फोर्ज (१.७४%), नेटवेब टेक्नॉलॉजी (२.४१%) या समभागात गुंतवणूकदारांना झाले आहे.

निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) मध्ये सर्वाधिक वाढ रिअल्टी (४.६८%), मेटल (१.९०%), बँक (१.४७%) या समभागात झाली असून मिडिया (१.१४%) समभागात आज घसरण झाली आहे. शुक्रवारी रेपो दरात कपात झाल्याबरोबरच ५० बीपीएस (BPS) बेसिसने कपात झाल्यानंतर बाजारात उत्साहाचे वातावरण होते. किंबहुना शेअर बाजारात सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात १ टक्क्यांने वाढ झाली होती. जागतिक परिस्थिती देखील अनुकूल असल्याने आशियाई व अमेरिकन बाजारातही तेजी दिसून आली होती. भारतीय व अमेरिकन व्यापारी धोरणावर चर्चा चालू असल्याने गुंतवणूकदारांना सकारात्मकता पहायला मिळत आहे.
Comments
Add Comment

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना