Lalitha Jwellery Mart Limited IPO : ललिता ज्वेलरी मार्ट लिमिटेडकडून 'इतक्या' कोटी आयपीओसाठी सेबीकडे अर्ज

प्रतिनिधी: ललिता ज्वेलरी मार्ट लिमिटेड (Lalitha Jwellery Mart Limited) कंपनीने आपले डीआरएचपी (Draft Red Herring Prospectus DHRP) सेबी (Security Exchange Board of India SEBI) कडे फाईल केली आहे. त्यामुळे कंपनी बाजारात आपला आयपीओ (Initial Public Offering IPO) गुंतवणूकदारांसाठी आणण्यास इच्छूक आहे. कंपनीने सेबीकडे यासंबंधीचा अर्ज केला आहे. असे सांगण्यात येत आहे की हा आयपीओ १७०० कोटी रुपयांचा असेल.


ही ललिता ज्वेलरी कंपनी मुख्यतः सराफ बाजारातील उत्पादने विकते ज्यामध्ये सोने चांदी हिरे व तत्सम उत्पादनांचा समावेश आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी क्षेत्र हे दक्षिण भारतात आहे. कंपनीची एकूण ५६ शोरूम आहेत ज्यामध्ये आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा ही राज्ये व पुदुचेरी हा केंद्रशासित प्रदेश समाविष्ट आहे. ५००० चौरस स्क्वेअर फूटहून अधिक परिसर असलेली ही दालने आहेत. या आयपीओतील १२०० कोटींचा फ्रेश इशू (Fresh Issue) सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी असणार आहे तर ५०० कोटींचा गुंतवणूक वाटा हा ऑफर फॉर सेल (OFS) पद्धतीने विकण्यात येईल. किरण कुमार जैन हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.


कंपनीने म्हटल्याप्रमाणे फ्रेश इशू मधील मिळणाऱ्या निधीचा वापर भांडवली खर्च, व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी व दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे. या आयपीओतील ५० टक्क्यांपर्यंत निधी हा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) यांच्यासाठी तर १५ टक्के वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदार (NIB) व ३५ टक्के वाटा हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी असू शकतो. याखेरीज पात्र कर्मचाऱ्यांकडून वर्गणीसाठी आरक्षण असणार आहे आणि कर्मचारी आरक्षण विभागात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सवलत या आयपीओसाठी दिली जात आहे.या कंपनीची स्थापना १९८५ साली झाली होती. बाजारातील अहवालानुसार कंपनीच्या महसूलात सीएजीआर मध्ये आर्थिक वर्ष २०२२-२४ काळात ४३.६२ टक्क्याने वाढ झाली होती.


अलीकडील आर्थिक अहवालांमध्ये आर्थिक वर्ष २०२३ मधील १३,३१६.८० कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १६,७८८.०५ कोटी रुपयांपर्यंत महसूल २६.०७% वाढल्याचे दिसून आले आहे.गेल्या वर्षीपर्यंत ४७ दुकाने ५३ संख्येवर पोहोचली आहेत. तसेच कंपनीच्या एकूण सोने आणि सोन्याच्या विक्रीच्या सरासरी दरात वाढ झाली आहे. तज्ज्ञांकडून आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ६.४९ ट्रिलियन रुपयांच्या भारतीय रत्ने आणि दागिन्यांच्या किरकोळ विक्री उद्योगाची वाढ आर्थिक वर्ष २०२९ पर्यंत १३-१४% च्या सीएजीआर (CAGR) ने होण्याची अपेक्षा आहे.


आयपीओपूर्वी प्लेसमेंटचा विचार करू शकते असे म्हटले जात आहे. असे झाल्यास नव्या फ्रेश इश्यूचा आकार २०% पर्यंत कमी होऊ शकतो. नियामक मंजुरीच्या अधीन राहून इक्विटी शेअर्स हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेडमध्ये सूचीबद्ध केले जातील.ललिता ज्वेलरी मार्टने २०२३ च्या आर्थिक वर्षात १३,३१६.८० कोटी रुपयांवरून २०२४ मध्ये १६,७८८.०५ कोटी रुपयांपर्यंत कंसोलिडेशन (Consolidation) केलेल्या एकत्रित महसुलात २६.०७% वाढ नोंदवली आहे.

Comments
Add Comment

ठाणे-घोडबंदरच्या वाहतूक कोंडीवर मराठी अभिनेत्याची मिश्कील पोस्ट

ठाणे - मुंबई आणि उपनगरांमध्ये माणसांप्रमाणेच वाहनांमध्येही वाढ होत आहे. तसेच शहरांमध्ये सुरू असलेल्या

भारतीय बाजारात टेस्लाच्या किमतीमध्ये घट होणार, कंपनीचा सर्वात मोठा निर्णय!

मुंबई : अमेरिकेची सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने २०२५ मध्ये भारतात मुंबई आणि दिल्ली या दोन

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

सुवर्ण व्यावसायिक धनंजय केतकर यांच्या अपहरण प्रकरणात १२ आरोपींचा सहभाग

देवरुख (प्रतिनिधी) : देवरुख शहराला हादरवून सोडणाऱ्या सोने व्यापारी धनंजय केतकर अपहरण व लूट प्रकरणात एकूण १२