'एमव्ही वान हाय' वरील १८ खलाशांना आयएनएस सुरतने वाचवले!

भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाची यशस्वी कामगिरी


नवी दिल्ली : भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल यांच्या तातडीच्या आणि समन्वित बचाव मोहिमेमुळे मोठा जीवितहानीचा धोका टळला आहे. सिंगापूरच्या 'MV Wan Hai 503' या मालवाहू जहाजावर कंटेनरमध्ये झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली होती. या संकटग्रस्त जहाजावरील २२ खलाशांपैकी १८ जणांना सुखरूप वाचवण्यात आले आहे, तर ४ जणांबाबत शोधकार्य सुरू आहे.


ही घटना ९ जून २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता माहिती व्यवस्थापन केंद्राला (IFC-IOR) समजली. त्यानंतर तात्काळ INS Surat आणि एक डॉर्नियर विमान घटनास्थळी पाठवण्यात आले. दुपारी ४:३० वाजेपर्यंत १८ खलाशांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले.


https://www.facebook.com/share/r/1BjnHcpZka/

आगीत जखमी झालेल्या खलाशांना तात्काळ प्राथमिक वैद्यकीय उपचार देण्यात आले असून, जहाज सध्या नवीन मंगळुरू बंदराकडे रवाना झाले आहे. तेथे पुढील उपचार आणि खलाशांची उतरवणूक केली जाणार आहे.


भारतीय नौदल, कोस्ट गार्ड, डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंग आणि इतर एजन्सींच्या संयुक्त प्रयत्नांमुळे एक मोठी समुद्रातील दुर्घटना टळली.

Comments
Add Comment

बिहारमध्य राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या