Health: दररोज सकाळी खा एक वाटी पपई, महिनाभरात शरीरात दिसतील हे बदल

मुंबई: पपई केवळ एक स्वादिष्ट फळच नाही तर तुमच्या आरोग्यासाठी वरदान आहे. हे शरीरास अनेक प्रकारचे फायदे देते. यामुळे त्वचा, पचन आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते. याशिवाय वजन घटवण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासही मदत करते. पपई तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सामील करून आरोग्य सुधारू शकता.



पचनशक्ती सुधारते


पपईमध्ये पाचक एन्झाईम असतात जे पचनास मदत करतात. तसेच बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यासारख्या समस्या दूर करण्यास मदत करतात. खासकरून तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर पपई त्याच्यावर रामबाण उपाय ठरू शकते.



वजन घटवण्यास फायदेशीर


पपईमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते आणि फायबर अधिक प्रमाणात असते. यामुळे वजन घटवण्यास मदत मिळते. पपईमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. याशिवाय पपईमध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने शरीराचा मेटाबॉलिक रेट वाढतो. यामुळे कॅलरीज वेगाने बर्न होण्यास मदत मिळते. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.



त्वचेसाठी फायदेशीर


पपईमध्ये व्हिटामिन ए, व्हिटामिन सी आणि व्हिटामिन ईसह अनेक अँटीऑक्सिडंट असतात यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होते.



हृदयाचे आरोग्य राहते चांगले


पपईमध्ये फायबर आणि पोटॅशियम असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असता. पपईमध्ये पोटॅशियम आणि फायबर असते यामुळे रक्तादाब कमी होतो आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.



इम्युनिटी वाढते


पपईमध्ये व्हिटामिन सी आणि इतर पोषकतत्वे असतात यामुळे इम्युनिटी मजबूत होण्यास मदत होते. व्हिटामिन सी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात आणि आजारांशी लढण्यास मदत करतात. यामुळे शरीराला आजारांपासून लढण्यास मदत मिळते. तसेच आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते.


Comments
Add Comment

स्वस्त किंवा जुना प्रेशर कुकर वापरताय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा! आरोग्यासाठी ठरू शकतो मोठा धोका

मुंबई: स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा प्रेशर कुकर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः जर तुमचा कुकर

Health : फिटनेस आणि स्नायूंच्या बळकटीसाठी प्रोटीनयुक्त आहार आवश्यक, 'या' ५ पदार्थांचा आहारात करा समावेश

मुंबई: निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल, स्नायूंची निर्मिती करायची असेल किंवा वजन कमी करण्याचे ध्येय असेल, तर

तरुण दिसायचंय? आहारात 'या' फळांचा करा समावेश, त्वचा राहील चमकदार आणि निरोगी

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेकांना अकाली वृद्धत्वाची लक्षणे

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा या बियांचा समावेश, हृदयविकाराचा धोका राहील दूर !

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकार हा एक सामान्य आणि चिंताजनक आजार बनला आहे. वयोगट कोणताही असो,

Health: निरोगी हृदयासाठी 'हे' ड्राय फ्रूट्स आहेत खूप फायदेशीर!

मुंबई: दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी 'जागतिक हृदय दिन' (World Heart Day) साजरा केला जातो. हृदयविकारांबद्दल जनजागृती करणे हा या

तुम्ही अजूनही प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड वापरता का? आजच वापर बंद करा नाहीतर...

मुंबई : स्वयंपाकघरात सर्रास वापरले जाणारे प्लास्टिकचे चॉपिंग बोर्ड आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. एका