Bob and HDFC Bank : पीएनबीसह बँक ऑफ बडोदा व एचडीएफसी बँकेने केली कर्जदारात कपात 'या' टक्क्यांवर घसरले आहेत व्याजदर !

प्रतिनिधी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी रेपो दरात (Repo Rate ) दरात कपात केल्यानंतर आता त्याचा परिणाम बँकेच्या धोरणात्मक निर्णयांवर दिसून येत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने आपल्या कर्जदरात (Lending Rate) ५० बेसिस पूर्णांकाने (50 Basis Points) कपात केली आहे. त्यामुळे आता बँक ऑफ बडोदाकडून कर्जावरील व्याजदरात कपात होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य कर्जदारांना मासिक हप्ता (EMI) मध्ये कटोती होणार आहे. याशिवाय एचडीएफसी बँकेने आपल्या मार्जिनल दर (Marginal Rates) मध्ये १० बेसिस पूर्णांकाने घट केल्याने त्याचा मोठा लाभ गृहकर्जधारक व इतर कर्जधारकांना मिळू शकतो.


याआधी पंजाब नॅशनल बँक (PNB) ने देखील ५० बेसिस पूर्णांकाने आपल्या कर्जदरात ५० बेसिस पूर्णांकाने घट केली होती. एचडीएफसीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, जून ७ पासून एमसीएलआर (MCLR) चे नवे दर लागू झाले आहेत. त्यामुळे व्याजदर ढोबळमानाने ८.९० टक्क्यावर पोहोचले आहेत. दोन वर्ष व त्यापुढील वर्षासाठी ९.१० टक्क्यांवर व्याजदर पोहोचू शकतो.


यापूर्वी आरबीआयने अपेक्षित २५ बेसिस पूर्णांकाने रेपो दरात कपात न करता ०.५० टक्क्याने कमी केल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात तरलता (Liquidity) वाढू शकते. त्यातूनच चलन पुरवठ्यात वाढ झाल्याने कर्जाबरोबरच अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आरबीआयच्या सहा सदस्यीय समितीने बहुमताने दरात कपात करण्याचा रक्कम घेतला. त्यामुळे आता ६ टक्क्यांवरून रेपो दरात ५.५० टक्क्यांवर घट झाली आहे.


तसेच कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये १०० बेसिस पूर्णांकाने कपात करून तो ३ टक्क्यांपर्यंत कमी केला ज्यामुळे आता बँकिंग व्यवस्थेत आधीच असलेल्या अतिरिक्त तरलतेत २.५ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या