क्रिकेट ऑस्ट्रेलिया करणार रोहित-विराटचा सन्मान ?

नवी दिल्ली : रोहित शर्मा आणि विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता भारताच्या या दोन दिग्गज क्रिकेटपटूंचा सन्मान करण्याचा विचार क्रिकेट ऑस्ट्रेलिया करत आहे. या वर्षी साधारण ऑक्टोबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यावेळी रोहित आणि विराटचा


हा सन्मान करण्यात येणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माने मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याचप्रमाणे भारताच्या २०२४ च्या टी-२० विश्वचषक विजयानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.


दोन्ही क्रिकेटपटू केवळ एकदिवसीय सामने खेळतानाच क्रिकेटप्रेमींना पहायला मिळणार आहेत. रोहित शर्माने ७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि त्यानंतर लगेचच १२ मे रोजी विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.


भारतीय संघ ऑक्टोबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. हा दौरा दोन्ही दिग्गजांसाठी कदाचित ऑस्ट्रेलियामधील अखेरचा दौरा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया या दोन क्रिकेटपटूंचा सन्मान करण्याचा विचार करत आहे.


टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत खेळत राहण्याचा मानस या दोन्ही क्रिकेटपटूंचा आहे. दरम्यान, कोहलीने आयपीएल २०२५ मध्ये आपला फॉर्म दाखवततर रोहितने स्पर्धेच्या अखेरीस महत्त्वपूर्ण खेळी केल्या. आता आगामी एकदिवसी सामन्यांमध्ये या दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा चाहत्यांना आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत