अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष


कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या पालिकेच्या मैदानातून पाण्याचा निचारा होत नसल्याने, मैदानाचा तलाव झाला आहे. यामुळे मैदानात चालण्यासाठी येणारे नागरिक, फेरफटका मारणारे ज्येष्ठ नागरिक आणि खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांनी मैदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. गेले कित्येक वर्ष पावसाळ्यात मैदानात पाणी साचते, तरी देखील पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.


कांदिवली पूर्वेला हुतात्मा राजगुरु उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या मार्गांवर महापालिकेचे अशोक नगर मैदान आहे. अशोक नगरमधील नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी आणि मुलांना खेळण्यासाठी एकमेव मैदान आहे. या मैदानाच्या दुरुस्तीसाठी आणि सुशोभीकरण करण्यासाठी पालिकेने तसेच म्हाडाने लाखो रुपये खर्च केले आहे. मैदानाला दोन प्रवेशद्वार असून बाजूला दोन सुरक्षा चौक्या आहेत.


तसेच मैदानात माती ऐवजी रॅबिट, खडीचे प्रमाण जास्त आहे. गेली कित्येक वर्ष पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही उपाययोजना पालिकेकडून करण्यात आलेली नाही, यामुळे पावसाळ्यात मैदानात पाणी साचून तलाव निर्माण होते. प्रवेशद्वारासह मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने, पावसाळा कालावधीत जवळपास चार महिने नागरिकांसह मुलांना मैदानात जाता येत नाही. नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील पालिकेने ठोस उपाययोजना केली नसल्याने, नागरिकांनी मैदानात जाणेच बंद केले आहे.


रस्त्यावर वाहने, पद पथावर अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान असल्याने, जेष्ठ नागरिकांना विरंगुळा अथवा पाय मोकळे करण्यासाठी पालिकेचे एकमेव मैदान आहे. मात्र पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने आम्हा जेष्ठ नागरिकांनी घराबाहेर जाणे बंद केले आहे.
- विक्रम वंडेकर, ज्येष्ठ नागरिक

Comments
Add Comment

प्रजासत्ताक दिनी धाराशिवमध्ये पोलिसाचा मृत्यू

धाराशिव : प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर थोड्याच वेळात ५५ वर्षीय मोहन भीमा जाधव या पोलीस अधिकाऱ्याचा

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास घराघरात पोहचविणार

नांदेड : 'हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते. त्यांचे बलिदान आपल्याला

अहिल्यानगरमधील खुनाचा उलगडा समोर, भाच्याने झोपेतच मामाला संपवलं; मामाच्या....

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये राहत्या घरी एका व्यक्तीचा खून झाला होता. शेवटी या घटनेचा उलगडा सुटला आहे. भाळावस्ती

लोणार सरोवराच्या पाण्याची पातळी अचानक २० फुटांनी वाढ

पाण्याची पातळी वाढण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही नागपूर : महाराष्ट्रातील बुलढाणा येथील लोणार सरोवर पुन्हा एकदा

शहीदी समागम कार्यक्रमासाठी भव्य लंगरची व्यवस्था

नांदेड : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ आणि २५ जानेवारी

बुलढाण्यात एसटी बसचा थरार; ब्रेक निकामी झाल्यावर चालकाने....

बुलढाणा : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे