राजिपच्या शाळांमध्ये शिक्षकांची एक हजारांहून अधिक पदे रिक्त

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची होणार आबाळ


अलिबाग : रायगड जिल्ह्यात राजिपच्या शाळांमध्ये शिक्षकांची एक हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुख्याध्यापकांची ७५ टक्के पदे रिक्त असून, आठ तालुक्यांतील शाळांमध्ये मुख्याध्यापकांचे एकही पद भरलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची होणार आबाळ होणार असल्याने पालकवर्गात नाराजीचा सूर आहे. रायगड जिल्ह्यात अडीच हजारांहून अधिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये मुख्याध्यापक, उपशिक्षक आणि पदवीधर शिक्षक असे मिळून ६ हजार २३१ पदे मंजूर आहेत. पण प्रत्यक्षात ५ हजार १५१२ पदे आजही रिक्त असल्याचे पाहायला मिळते आहे. जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्तपदांची टक्केवारी १७.३ इतकी आहे. मुख्याध्यापकांची १११ पदे मंजूर असताना केवळ ३२ पदे भरलेली आहेत. महाड, माणगाव, म्हसळा, मुरुड, पेण, रोहा, श्रीवर्धन, तळा या आठ तालुक्यांत एकही मुख्याध्यापक कार्यरत नाही. एकीकडे खासगी आणि इंग्रजी शाळांचे आक्रमण सुरू असताना दुसरीकडे सरकारी शाळांमधील शिक्षकांची कमतरता मुलांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम करणारे आहे.



रायगड जिल्ह्यात नवीन इंग्रजी माध्यमांची संख्या दरवर्षी वाढते आहे. शहराबरोबरच गावा-गावांतील पालकांचा कल इंग्रजी मध्याम शाळांकडे वाढल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी शासनाने सेवानिवृत्त मानधन तत्त्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला होता; पटसंख्या कमी झाल्याने अनेक दोन शिक्षकी शाळा एक शिक्षकी झाल्या आहेत.


यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचा विस्तार मोठा असल्याने विद्यार्थी गुणवत्तेच्या आनुषंगाने केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी जि. परिषद शाळांना भेटी देणे आवश्यक आहे.


प्राथमिक शाळांमधील रिक्त पदे


पद                 मंजूर पदे     भरलेली पदे   रिक्त पदे
मुख्याध्यापक  १११             ३२                  ८३
उपशिक्षक      ५१८४         ४५२०             ७२१
पदवीधर         ९३६           ६६३                २७३




शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी नवीन शिक्षण संच धोरण आणले आहे. या धोरणानुसार, प्राथमिक शाळांमधील सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी शिक्षकांची संख्या कमी होणार आहे. या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होणार असल्याने पुढील काही दिवसांत शिक्षकांची कमतरता भरून निघेल, अशी आशा आहे.
- पुनिता गुरव,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)



Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर

दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

रायगड: शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडले आहेत.