रत्नागिरीत एलपीजी टँकर आणि मिनी बसचा अपघात

रत्नागिरी : चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स मिनी बसला सीएनजी गॅस घेऊन जात असलेल्या टँकरने धडक दिल्याने अपघात झाला. अपघातानंतर मिनी बस वीस फूट खोल दरीत कोसळली. बावनदी परिसरात ही दुर्घटना घडली. टँकरमधून गॅसची गळती झाली. टँकर धडकेनंतर जवळ असलेल्या गुरांच्या गोठ्याला जाऊन धडकला. गोठ्याजवळ असलेल्या एका घराला पण या अपघाताचा फटका बसला. दुर्घटनेत गुरांचा गोठा जळून खाक झाला. आग लागल्यामुळे दोन गुरे जखमी झाली. घराजवळ उभी असलेली रिक्षा जळून गेली. घरावरील फायबरचे पत्रे जळून गेले. अपघातात वीस ते पंचवीसजण जखमी झाले. जखमींना तातडीने रत्नागिरी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलीस यंत्रणा, महसूल, अग्निशमन दल, स्थानिक पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. सीएनजी टँकर मधून होणारी गळती थांबवण्यात आली आहे. अपघात झाला त्यावेळी घरात असलेली माणसं आवाज ऐकून घराबाहेर आली. यामुळे धडकेनंतर टँकर गोठ्याला आणि गोठ्याजवळच्या घराला आपटला तरी घरातील रहिवासी सुरक्षित आहेत.
Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी

मागील ११ वर्षांत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ११० हून अधिक मराठी शाळांना टाळे मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईकरांच्या आरोग्याला महापालिका निवडणुकांचा फटका !

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी दरम्यान, शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई