लोणावळा : भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू

लोणावळा : पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (८ जून) घडली. तरुणांचा ग्रुप धरणावर फिरायला गेला होता. यावेळी ही घटना घडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, साहिल अश्रफ अली शेख आणि मोहम्मद जमाल अशी बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.दोन्हीही तरुण उत्तर प्रदेशातील असून कामानिमित्त लोणावळ्यात राहत होते.रविवारी(दि.८) सुट्टी असल्याने लोणावळ्यात राहणाऱ्या तरुणांचा ग्रुप भुशी डॅम परिसरात फिरायला गेला होता.


धरण परिसरात फिरत असताना त्यांना पाणी पाहून पोहण्याचा मोह झाला. त्यामुळे सर्व मित्र धरणात उतरले.पाण्यात उतरल्यानंतर पोहत होते. दोघे बरेच आतमध्ये गेले. त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि बुडायला लागले. इतर मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली. पण, मदत मिळेपर्यंत दोघेही बुडाले होते.


या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा पोलीस, आपत्काली पथक आणि शिवदुर्ग टीम घटनास्थळी आली. त्यांनी पाण्यात शोध घेऊन दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई! प्रतिभा चाकणकरांना पोलिसांची नोटीस

- कोट्यवधींच्या व्यवहारांचा तपास तीव्र  भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून रुपाली चाकणकर

Crop registration : आता प्रत्येक हंगामात १०० टक्के पीक नोंदणी बंधनकारक

डिजिटल क्रॉप सर्वेक्षण होणार; तलाठी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या जबाबदाऱ्या

'Operation Tiger' : खासदार फुटी’च्या अफवांचे सूत्रधार उबाठाचेच नेते!

अपयशावरून लक्ष हटवण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’चे थोतांड; खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका मुंबई :

Pune FDA Action : पुण्यात एफडीएची कारवाई; मावळमध्ये भेसळयुक्त आंबा पल्प जप्त

पुणे : उन्हाळ्यात नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत

Nanded Railway : महाराष्ट्रातून उत्तर भारतीयांसाठी रेल्वेगाड्या उपलब्ध, पण नांदेड एक्स्प्रेसचा मुहूर्त कधी लागणार ?

मुंबई : मुंबईतून उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवनवीन गाड्या उपलब्ध होत आहेत. मात्र,

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार; कामशेतमध्ये दुकानाच्या चेंजिंग रूममध्ये.....

पुणे : पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरात दुकानांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी