पोलादपूर तालुक्यात पर्यावरण दिन ठरला ‘प्रदूषण दिन’

खासगी ठेकेदार नेमल्याने हातरिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान


पोलादपूर : जगभरात ५ जूनचा दिवस हा पर्यावरण दिन म्हणून साजरा होत असताना पोलादपूर तालुक्यात मात्र प्रदूषण दिन ठरला आहे. शिवराजधानी रायगडावर राज्याभिषेक दिनाच्या नियोजनबद्ध वर्धापन दिनासाठी पोलादपूर तालुक्यातील प्रशासन तत्परतेने रवाना झाले असताना प्रदूषणकारी असामाजिक तत्त्वांनी पोलादपूर तालुक्यात कापडे बुद्रुक व वाकण खांबेश्वरवाडी दरम्यान रसायनयुक्त सांडपाणी आणि आंबेनळी घाटातील कुंभळवणे फाट्याजवळ संरक्षक कठड्यालगत सुमारे हजारभर रासायनिक घनकचऱ्याची पोती उघड्यावरच टाकण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.


चार वर्षांपूर्वी पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटालगत रासायनिक सांडपाणी टाकण्याचे प्रकार सातत्याने घडत असताना आता प्रदूषणकारी असमाजिक तत्त्वांनी आता पोलादपूर तालुक्यातील वाकण खांबेश्वरवाडीतील नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी सोडल्याचे जागतिक पर्यावरण दिनी उघडकीस आले. यावेळी वाकण ग्रुपग्रामपंचायतीचे सरपंच जंगम यांनी दूषित पाण्याचे नमूने तपासण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पितळवाडीकडे सोपविण्यात आले असून या पाण्याच्या नमून्यांचा पिण्यायोग्य आहे अथवा कसे याबाबतचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा अथवा नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली.



पोलादपूर तालुक्यातील विविध नळपाणीपुरवठा योजनांच्या जॅकवेल नदीपात्रालगत असून काही विंधन विहिरींच्या पाण्यासही रासायनिक सांडपाण्याचा रंग आणि गंध तसेच चव येत असल्याने हे दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्यास हानीकारक असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर वाई सुरूर रस्त्यावरील आंबेनळी घाटाच्या कुंभळवणे फाट्याजवळ संरक्षक कठड्यालगत दरीच्या बाजूला सुमारे हजारभर रासायनिक घनकचऱ्याची पोती उघड्यावरच टाकण्यात आली असून यामध्ये रिऍक्टरमधील ऍश म्हणजेच राख असण्याची शक्यता आहे.


पोलादपूर पोलिसांसमोर आव्हान


शिवराजधानी रायगडावर राज्याभिषेक दिनाच्या नियोजनबद्ध वर्धापन दिनासाठी पोलादपूर तालुक्यातील पोलीस, महसूल, आरोग्य व पंचायत समितीतील प्रशासन तत्परतेने रवाना झाले असताना पर्यावरण दिनाला प्रदूषण दिनामध्ये बदलणाऱ्या या केमिकल वेस्ट डिस्ट्रॉयर्सना शोधून कडक कारवाई करण्याचे आता पोलादपूर पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले असून प्रशासनानेही नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या या प्रदूषणकारी समाजकंटकांविरुद्ध
कडक कारवाईचे हत्यार उपसण्याची गरज स्पष्ट झाली आहे.

Comments
Add Comment

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर

नांदगाव मुरुड : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याच्या