माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा शिवसेनेत प्रवेश, अहिल्यानगर आणि ठाणे जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

शहापूरमधील उबाठाच्या ७०० कार्यकर्त्यांनी हाती घेतले शिवधनुष्य


ठाणे: एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो, हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आणि अनुभवलं. पूर्वीचे स्थगिती सरकार होते तर महायुतीचे प्रगतीचे आणि समृद्धीचे सरकार आहे, असा टोला शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला लगावला.  माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह अहिल्यानगरमधील श्रीरामपूरच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तसेच ठाणे जिल्ह्यातील शहपूरमधील सुमारे ७०० कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे आदी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन चाललोय. मुख्यमंत्री असताना राज्यात लाडकी बहिण, लाडका भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी व ज्येष्ठांसाठी कल्याणकारी योजना आणल्या. त्यामुळेच महायुतीला विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत मिळाले. आताही महायुतीची दुसरी इनिंग सुरु आहे, देवेंद्रजी आणि आमची टीम महाराष्ट्राला पुढे नेतेय. या राज्याचा विकास, प्रगती झाली पाहिजे आणि सर्वसामान्य माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे, या हेतूने सरकार काम करत आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


माजी आमदार भानुदास मुरकुटे, नीरज मुरकुटे, संजय छल्लारे, सिद्धांत छल्लारे, लक्ष्मण कुमावत, भगवान उपाध्ये, शेखर दुब्बैया, तेजस बोरावके, रोहित नाईक, संजय साळवे, संजय परदेशी, महेंद्र टाटिया यांच्यासह श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील शेकडो सहकारी, अनेक माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिप सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच शेकडो सामाजिक कार्यकर्ते, विदर्भ शिक्षक संघटनेचे डॉ. दिलीप सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे आणि प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वात शहापूर तालुक्यातील उबाठा गटाच्या जवळपास ७०० कार्यकर्त्यांनी आज धनुष्यबाण हाती घेतला. तसेच लातूरमधील महिला भगिनींनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.



उच्चशिक्षित तरुण राजकारणात येणं ही काळाची गरज


धनुष्यबाण हाती घेणाऱ्या भानुदास मुरकुटे यांचा नातू नीरज मुरकुटे याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष कौतुक केले. नीरज मुरकुटे हा ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन आला आहे. त्याने शिवसेनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. समाजाच्या दृष्टीने उच्चशिक्षित पिढी राजकारणात येणं, ही काळाजी गरज आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवसेनेचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील नुकताच चार देशांचा दौरा करुन मायदेशी परतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. श्रीकांत यांनी खासदारांच्या शिष्टमंडळाचे यशस्वी नेतृत्व केलं आणि परदेशात ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका पटवून दिली. या चारही देशांनी भारताला पाठिंबा दिला आणि पाकिस्तानला विरोध केला. पाकिस्तानचा खरा चेहरा उघडा करण्याचे काम या शिष्टमंडळाने केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment

Secretary Kiran Pawaskar : उद्धव ठाकरेंनी “माफी दौरा” काढावा”

मुलाचे करियर वाचण्यासाठी उद्धव ठाकरेंची धावपळ सुरू शिवसेना सचिव किरण पावसकर यांची खरमरीत टीका मुंबई  :

Omraje Nimbalkar : मंत्री होणे ही माझी प्राथमिकता नाही!

ओमराजे निंबाळकर; सामान्य माणसाच्या कामातून टीकेला उत्तर देईन मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात

Maharashtra Politics : शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांना उधाण; मुलावरील आरोपांमुळे भेटल्याचा रोहित पवारांचा दावा मुंबई : ‘ऑपरेशन

Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar : श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक;

पुणे : उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरेंचा एकत्र विमान प्रवास

ऑपरेशन टायगर’नंतरची पहिलीच भेट मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही, असे म्हणतात. उबाठा

Gokul Gite : "निकालाच्या चार दिवस आधीच ठरलं होतं सगळं"; श्रीकांत शिंदेंसोबतच्या 'त्या' गुप्त भेटीचा गोकुळ गीतेंचा मोठा दावा

Gokul Gite : विधान परिषद निवडणुकीत (Legislative Council Election) नाशिकच्या जागेवर अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवणारे आमदार गोकुळ गीते (MLA