Wild Vegetables: पावसामुळे यंदा रानभाज्यांचे लवकर आगमन, ग्राहकांची मागणी

जिल्ह्यातील अनेक बाजारात रानभाज्या विक्रीसाठी येण्यास सुरुवात 


दिंडोरी:  सुरगाणा, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवण या आदिवासी भागात पावसाळ्यात येणार्‍या रानभाज्यांचे (Wild Vegetables) यंदा लवकर आगमन झाले आहे. त्यामुळे ग्राहकांचाही या भाज्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोणत्याही प्रकारची नियोजित शेती किंवा निगा न राखता, रानावनात तसेच पायवाटात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या या भाज्यांमध्ये पोषकतत्त्वांचा मुबलक खजिना असल्याने आयुर्वेदात त्यांना वरचे स्थान आहे.

आदिवासी भागात पारंपरिक अन्न


जंगलात शेतांच्या बांधावर, माळरानात त्या आढळतात. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात. आदिवासी भागात त्या आवर्जून खाल्ल्या जातात. आदिवासी भागात शेवळा, वाघाटा, दिघडी आदींचा आजही पारंपरिक अन्न म्हणून वापर होतो. ऋतूनुसार त्यांना या भाज्या सहज उपलब्ध होत असून, जुन्या पिढीतील व्यक्तींना भाज्यांचे औषधी गुणधर्म माहीत आहे. नवीन पिढीतही हे ज्ञान कायम आहे. या वनस्पती त्यांच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक बनल्या आहेत. बाजारपेठेतून येणारा भाजीपाला विकत घेण्यापेक्षा जंगलात येणार्‍या रानभाज्या शोधण्यासाठी आदिवासी लोक आता भर देत आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या बाजारात रानभाज्या विक्रीसाठी येण्यास सुरुवात झाली आहे.

शेवळा, चाई, कवळी, मोखा, इगळी, रुखाळू, तेरा, दिघडी, वाघाट, तरण, काटवल, माल कामोनी, पांढरा कुडा, कुळमुळी, केना, कोंबडा, तरोटा, पानवेल, काळा पेठारा, पांढरा पेठारा, बांबूवाष्टे, भराटी, मटारू, राजगिरा, रानआल, रानकोचई, रानमटाळू, वाघोटी, तांदुळजा, पाथरी, माठ, घोळ, टाकळा, सराटे ई रानभाज्यांचे प्रकार आढळून येतात.

रानभाज्या या जंगलात बिगरखतांच्या उगवत असल्याने या भाज्या खाल्ल्यास शरीरास उपयोगी पडणारे क्षारांचे प्रमाण म्हणजे प्रोटीन, कॅल्शिअम, टाइप टू न्यू ट्रेन जास्त असतात. त्यामुळे आम्ही नागरिकांना पावसाळ्यात रानभाज्या खाण्याचे आवाहन आवर्जून करतो, असे डॉ. दिलीप रणवीर, तालुका वैद्यकीय अधिकारी, सुरगाणा यांनी सांगितले.
Comments
Add Comment

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८

‘अण्णांनी’ केलं ‘दादांना’ गारद

मोहोळांच्या रणनितीपुढे अजित पवार फिके; राष्ट्रवादीची पडझड पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी

मालेगाव महापालिकेत ‘इस्लाम’ची मुसंडी

मुंबई : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून निवडणूक झालेल्या ८३

वसंतदादा पाटील यांची चौथी पिढी राजकारणात

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील वारसदार हर्षवर्धन पाटील यांनी

लातूरमध्ये कॉग्रेसचा ‘ हात’ भारी

अमित देशमुख यांनी चक्रव्यूह भेदले लातूर : दलित, मुस्लिम आणि लिंगायत मतांचा आधार घेत आखलेल्या रणनीतीला भाजपच्या