Tata Motors: टाटा मोटर्सकडून देशभरात मान्‍सून चेक-अप कॅम्‍पचे आयोजन

विद्यमान ग्राहकांसाठी मोफत वेईकल तपासणी आणि आकर्षक फायदे


मुंबई: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह उत्‍पादक कंपनीने आज ग्राहकांसाठी देशभरात मान्‍सून चेक-अप कॅम्‍पच्‍या शुभारंभाची घोषणा केली. ५०० शहरांमध्‍ये राबवण्‍यात येणारा आणि १,०९० हून अधिक अधिकृत वर्कशॉप्‍सच्‍या पाठबळासह हा व्‍यापक सर्विस उपक्रम ६ जून ते २० जून २०२५ पर्यंत राबवण्‍यात येईल.पावसाळा सुरू होत असताना या उपक्रमाचा ओलसर व आव्‍हानात्‍मक ड्रायव्हिंग स्थितींमध्‍ये सानुकूल वेईकल कार्यक्षमता आणि सुरक्षिततेची खात्री घेण्‍याचा मनसुबा आहे. ग्राहक मोफत सर्वसमावेशक वेईकल हेल्‍थ तपासणीचा लाभ घेऊ शकतात, ज्‍यामध्‍ये आवश्‍यक सिस्‍टम्‍सना कव्‍हर करणारे तीसहून अधिक महत्त्वपूर्ण तपासणी मुद्दे आणि ईव्‍ही-विशिष्‍ट डायग्‍नोस्टिक्‍सचा समावेश आहे. हे शिबीर कार टॉप वॉश,ओरिजिनल स्‍पेअर पार्ट्स, इंजिन ऑईल, अँक्‍सेसरीज, विस्‍तारित वॉरंटी व लेबर चार्जवर (कामगार शुल्‍क) विशेष सूट देखील देते.


अधिक मूल्‍याची भर म्‍हणजे ग्राहक नवीन टाटा कार्सवर आकर्षक एक्‍स्‍चेंज ऑफर्स, तसेच त्‍यांच्‍या विद्यमान वेईकल्‍सच्‍या मोफत तपासणीचा लाभ घेऊ शकतात.टाटा मोटर्स मूल्‍य-केंद्रित सर्विस अनुभव देत ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाला अधिक दृढ करत आहे, जेथे सुरक्षितता, विश्‍वास आणि सोयीसुविधेला प्राधान्‍य दिले जाते. ग्राहकांना मान्‍सून चेक-अप कॅम्‍पचा अधिकाधिक फायदा घेण्‍यासाठी त्‍यांच्‍या जवळच्‍या अधिकृत टाटा मोटर्स वर्कशॉपला भेट देण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे.


अधिक माहितीसाठी ग्राहक १८०० २०९ ८२८२ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा customercare@tatamotors.com येथे ईमेल करू शकतात.

Comments
Add Comment

फेस स्टीम घेण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का ?

फेस स्टीम किंवा चेहऱ्याला वाफ देण्याचे अनेक सौंदर्यदायी फायदे होतात . वाफ घेतल्यामुळे त्वचेची छिद्रे उघडतात,

अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

हैदराबाद : 'झुकेगा नही' म्हणणारा अभिनेता कायदेशीर पेचात अडकला आहे. गेल्या वर्षी हैदराबादमध्ये 'पुष्पा २'च्या

नवं वर्षाचे स्वागत कसे करावे? जाणून घ्या खास टिप्स्

मुंबई: नववर्षाच्या स्वागताला केवळ दोन दिवस उरले आहेत. नवे वर्ष, नव्या आशा, नवी स्वप्न या सर्वांसाठीचे नियोजन

दीपिकाच्या रंगावर प्रश्नचिन्ह? ध्रुव राठीच्या व्हिडीओने उडवली बॉलीवूडमध्ये खळबळ

मुंबई : गोरे रंग पे ना इतना गुमान कर…’ हे गाणं अनेकांना परिचित आहे. मात्र सध्या बॉलीवूडमधील गोऱ्या रंगामागचं

तरुणाईत अक्षय खन्नाची क्रेझ, चाहत्यांसाठी २०२५ ठरले खास

मागील अनेक वर्षांपासून बॉलिवूड विश्वात एक चेहरा सक्रिय आहे. मात्र त्याच्या आजवरच्या भुमिकांमुळे तो चर्चेत आला

वेब सीरिज विश्वातील २०२५ चा नवा चेहरा, लक्षवेधी ठरलेला 'जयदीप'!

भारतीय वेब सिरीज वर्षानुवर्षे वेगाने वाढत आहेत. चित्रपट, नाटकांप्रमाणेच वेब सिरीज आता भारतीयांच्या मनोरंजनाचा