Russia Ukraine War: रशियाचा युक्रेनवर ४० क्षेपणास्त्रे आणि ४०० ड्रोनचा भयंकर हल्ला!

रशियाचा युक्रेनवर ड्रोन, क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव


कीव्ह: रशियाने शुक्रवारी सकाळी युक्रेनची राजधानी कीव्हसह इतर शहरांवर केलेल्या भयंकर हल्ल्यांत युक्रेन अर्ध्याहून अधिक बेचिराग झाल्याचे वृत्त आहे. हा हल्ला इतका भयंकर होता की, ज्यामुळे युक्रेनच्या अनेक शहरांत  कित्येक तास स्फोटांचे आवाज येत होते. या हल्ल्यांमुळे कित्येक इमारतीमधून आगीचे लोळ उठलेले दिसत होते. या हल्ल्यात रशियाने ४० क्षेपणास्त्रे आणि ४०० हून अधिक ड्रोनचा वापर केल्याचे युक्रेनच्या सूत्रांनी म्हटले आहे.


रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये अनेक नागरी वस्तीवर देखील हल्ले झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान युक्रेनच्या  हवाई सुरक्षा प्रणालीने रशियाच्या अनेक क्षेपणास्त्रे व ड्रोनना लक्ष्य केले. ज्यांचे जळते अवशेष नागरी वस्त्यांवर पडल्याने अनेक भागांत आग लागली. या हल्ल्यांत युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे वृत्त असून कित्येक ठिकाणी मदत व बचाव कार्य सुरू आहे. या हल्ल्यात ५ जण मृत्यूमुखी तर २० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.  दरम्यान या हल्ल्यानंतर इमारतींसह ढिगाऱ्यांमध्ये शोधमोहिमेसह बचावकार्य सुरू असल्याचे कीव्हचे महापौर विताली क्लित्स्को यांनी म्हटले आहे.



युक्रेनच्या नागरी वस्तीवर हल्ला 


युक्रेनियन हवाई दलाने इशारा दिला आहे की अनेक रशियन TU-95MS स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सनी उड्डाण केले आहे आणि कदाचित क्रूझ क्षेपणास्त्रे देखील डागली आहेत. झेलेन्स्की म्हणाले की रशियाने रात्री १०३ ड्रोन आणि एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले, डोनेस्तक, खार्किव, ओडेसा, सुमी, चेर्निहिव्ह, डनिप्रो आणि खेरसनसह अनेक प्रदेशांवर हल्ला केला. या हल्ल्यात काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.



रशियाने घेतला ४० विमानांचा बदला 


रशियाने युक्रेनवर ड्रोनचा अक्षरश: वर्षाव केला. ज्यामध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी तर कहरच केला. या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आली आहे. कीवमधील ओब्लान आणि क्लित्स्कोमध्ये सतत सायरनचे आवाज ऐकू आले.  रशियन हल्ल्यात ५ युक्रेनियन लोकांचा मृत्यू झाला आहे, खार्किवमध्ये ४ मुले जखमी झाली आहेत आणि एकूण डझनभर लोक जखमी झाले आहेत.



डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य अन् रशियाचे हल्ले


अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धावर तोडगा काढण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर बुधवारी एक वक्तव्य केले होते. या दोन्ही देशांना शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने पुढाकार घेण्यापूर्वी काही काळ मनसोक्त लढू देणेच योग्य ठरेल, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर काही तासांतच रशियाने हे हल्ले केले आहेत.

Comments
Add Comment

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या

इस्त्रायलचा गाझावर हल्ला, ६ ठार

गाझा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीत शांतता नांदावी म्हणून गाझा पीस प्लॅनची घोषणा

सुदानमध्ये ७७ लाख लोक करतायत उपासमारीचा सामना, लाखो मुलांना कुपोषणाचा धोका

सुदान (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात गरीब देश दक्षिण सुदान सध्या भयंकर संकटाचा सामना करत आहेत. तेथे आलेल्या