आता मुंबईत किनारा मार्गावर मिळणार थांबा

पालिकेकडून 'या' चार जागांची निवड


मुंबई : मरिन ड्राइव्ह ते वरळी ते वांद्रे वरळी सी लिंकपर्यंतच्या मुंबई सागरी किनारा मार्गाचे सर्व टप्पे खुले करण्यात आले आहेत. या मार्गाला वाहनचालकांनीही पसंती दिली असून आता मुंबई महापालिका या मार्गावर बेस्ट बसला थांबे देणार आहे. त्या्साठी चार ठिकाणांची निवडही केली आहे. मरिन ड्राइव्हप्रमाणे सागरी किनारा मार्गावर विहारपथ, सीसीटीव्ही व अन्य सुरक्षा उपाययोजान केल्यानंतर बेस्ट बसगाड्यांना थांबे देण्यात येतील, असे मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.



मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर मुंबईच्या टोकापर्यंत म्हणजेच नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारा रस्ता प्रकल्प टप्प्याटप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गंत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्ीट उड्डाणपूल) ते वरळी वांद्रे सी लिंकच्या टोकापर्यंत उभारण्यात आला आहे. १०.५८ किमी इतकी लांबी आहे. या मार्गावरून १२ मार्च २०२४ पासून आतापर्यंत ५० लाखांपेक्षा जास्त वाहनांनी ये-जा केली आहे. तसेच दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास सागरी किनारा मार्गावरून सुरू असतो. सध्या सकाळी ७ ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहन चालकांसाठी मार्ग खुला आहे.


सागरी किनारा मार्गावर बेस्ट बसबसगाड्यांनाही थांबा देण्यासाठी महापालिका विचार करत आहे. त्यासाठी चार जागांचीही निवड केली आहे. येथे बस थांबे बनवण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या मार्गावर वरळी दिशेने जाताना बोगद्याबाहेर, ब्रिच कँडीजवळ, वरळी पूनम चेंबरमागील बाजू आणि वरळी डेअरी समोरच दोन्ही दिशेला बसथांबे करण्यासाठी या जागांची निवड करण्यात आल्याचे सांगितले.


महापालिकेकडून मरिन ड्राइव्हप्रमाणेच सध्या किनारा मार्गाला लागूनच फेरफटका मारण्यासाठी विहारपथ (प्रोमिनेड) केला जात आहे. हे काम १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. आता ते ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. विहारपथाच्या कामाबरोबर सीसीटीव्ही बसवण्याची कामेही गतीने सुरू आहेत. या कामांसह सुरक्षेचे सर्व उपाय केल्यानंतरच बसथांबे देण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. ज्या चार जागांची निवड केली आहे, तेथे सबवे असून बेस्ट बस मधून उतरताच या सबवेतून प्रवाशांना पूर्व-पश्चिम दिशेला निश्चित केलेल्या ठिकाणी जाता येणार आहे.


तसेच बेस्ट बस प्रवाशांना विहारपथावरही जाता येईल. यासंदर्भात बेस्ट उपक्रमाशीही लवकरच बैठक घेतली जाणार आहे. तर बेस्ट उपक्रमानेही सागरी किनारा मार्ग सुरू होताच बेस्ट बस थांब्याबाबत चर्चा केली होती. सध्या मुंबई सागरी किनारा मार्गावरून बेस्टची ए ७८ क्रमांकाची एसी बस धावते. ही बस भायखळा रेल्वे स्थानक पश्चिम ते कुलाबा बस आगारापर्यंत धावते. सातरस्ता, महालक्ष्मी स्थानक, हाजी अली, ब्रीच कॅण्डी, भुलाभाई देसाई रोड, सागरी किनारा मार्ग, मरिन ड्राइव्ह, चर्चगेट स्थानकाहून ही बस पुढे जाते. मात्र या बसला सागरी किनारा मार्गावर थांबा नाही. या बसच्या सोमवार ते शुक्रवार १९ फेऱ्या आणि रविवारी काही मोजक्याच फेऱ्या होतात.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.