६६व्या वाढदिवशी ‘बोल्ड’ लूकने सोशल मीडियावर धूम; नीना गुप्तावर कौतुक आणि टीकेची जोरदार चर्चा!

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी नुकताच आपला ६६ वा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. 'मेट्रो इन दिनों' या चित्रपटाच्या टीमसोबत झालेल्या सेलिब्रेशनमध्ये नीना यांचा लूक चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांनी सफेद रंगाचा स्टायलिश 'काफ्तान ड्रेस' आणि ट्रेंडी ‘बिस्किट ब्रा’ असा बोल्ड पेहराव केला होता.


नीना यांचा हा आत्मविश्वासपूर्ण अंदाज काही जणांना आवडला, तर काहीजणांनी त्यांच्या वयाचा दाखला देत सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं. काही युजर्सनी त्यांच्या ड्रेसिंग सेन्सचं कौतुक केलं, "ती स्वतःच्या अटींवर आयुष्य जगते, तिला जे आवडतं ते घालते", अशी प्रतिक्रिया देत समर्थन केलं. तर काहींनी “थोडी तरी शरम बाळगा मॅडम” अशा टीका करत तिला वयानुसार कपडे घालण्याचा सल्ला दिला.


या पार्टीत आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा आणि दिग्दर्शक अनुराग बसू हेही उपस्थित होते. पण सर्वांची नजर नीना यांच्यावरच खिळून राहिली. विशेष म्हणजे, तिचा ड्रेस तिच्या मुलगी मसाबा गुप्ताच्या फॅशन लेबलचा होता.


नीना गुप्ता यांचा वैयक्तिक जीवन प्रवासही तितकाच चर्चेत राहिलेला आहे. प्रसिद्ध क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबतच्या नात्यामुळे त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यांच्या या नात्यातून मसाबा गुप्ता हिचा जन्म झाला. मसाबा आता एक यशस्वी फॅशन डिझायनर आहे. नंतर २००८ मध्ये नीनाने विवेक मेहरा या चार्टर्ड अकाउंटंटशी लग्न केलं.


एकूणच, नीना गुप्ताचा यांचा हा बोल्ड लूक, तिचा आत्मविश्वास, आणि वयाला धक्का देणारी स्टाईल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. जिथे काहींनी ती अभिनेत्री म्हणून गौरवली, तर काहींनी समाजाच्या 'मापदंडांवर' तिला झोडपलं.

Comments
Add Comment

Katrina Kaif Pregnancy : कुणी तरी येणार येणार गं! विकी-कतरिनाकडे लवकरच येणार गोड पाहुणा, बेबी बंपचा फोटो शेअर करत म्हणाले...

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत

'कांतारा चॅप्टर 1' चा ट्रेलर प्रदर्शित: रिषब शेट्टीसोबत झळकणार ही अभिनेत्री !

मुंबई : 'कांतारा' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. केवळ कन्नड भाषेतच नव्हे, तर हिंदी,

तेजस्विनीचा पांढऱ्या साडीतील मनमोहक लूक, सोशल मीडियावर धुमाकूळ!

मुंबई : नवरात्रोत्सव सुरू झाला असून, या उत्सवात प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाचे पारंपरिक पोशाख परिधान करण्याची

Kantara A Legend Chapter 1 : अक्षरश: अंगावर काटा! 'कांतारा चॅप्टर १'च्या ट्रेलरने उडवले प्रेक्षकांचे होश

कन्नड सिनेसृष्टीत २०२२ मध्ये ‘कांतारा’ने (Kantara A legend Chapter 1) प्रेक्षकांची मनं जिंकत प्रचंड धुमाकूळ घातला. ऋषभ

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

नवी दिल्ली: मल्याळम सुपरस्टार मोहनलाल त्यांच्या सिने कारकीर्दीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल २०२३ चा प्रतिष्ठित

'कल्की 2898 AD' मधून काढल्यानंतर दीपिकाची भावनिक पोस्ट !

मुंबई : दीपिका पादुकोण सध्या चर्चेचा विषय बनली आहे. अलीकडेच तिला प्रभासच्या 'कल्की 2898 AD' या चित्रपटाच्या