Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत होता. मात्र आता आम्ही तुम्हाला अशा एका लग्नाची गोष्ट सांगणार आहोत की त्याने तुम्ही थक्क व्हाल. हे दोन्ही राजकारणी भारतीय आहे, मात्र लग्नाचा बार उडवून दिलाय तो जर्मनीत. तर चला जाणून घेऊया कोण आहेत हे राजकारणातले दोन चेहरे.



कोंबडा झाकला तरी आरवायचा राहत नाही. तसंच काहीसं या गुपचूप केलेल्या लग्नाबाबत होतं. तृणमूल काँग्रेसच्या फायरब्रँड समजल्या जाणाऱ्या नेत्या आणि खासदार महुआ मोईत्रा पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी केंद्रावर किंवा राजकीय घडामोडींवर भाष्य केलेलं नाही. हो, तुम्हाला आता उत्सुकता लागली असेलच. सांगतो. खासदार महुआ मोईत्रा यांनी बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा यांच्याशी लग्नगाठ बांधलीय. बरं का, हा विवाहसोहळा भारतात नव्हे तर चक्क जर्मनीत पार पडलाय. अतिशय खासगीत हा विवाहसोहळा संपन्न झाला. या विवाहाचे फोटो आता व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोत महुआ गोल्ड आणि हलक्या गुलाबी रंगाच्या साडीत, तर पिनाकी पारंपरिक पोशाखात दिसत आहेत. दोघांनीही एकमेकांचा हात धरलाय आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.



सद्या दोघांनीही लग्नाबाबत भाष्य केलेलं नाही. पिनाकी मिश्रा हे बिजू जनता दलाचे नेते. ते ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. हेच पिनाकी मिश्रा सर्वोच्च न्यायालयाचे वकीलही आहेत. त्यांची पहिली पत्नी संगीता मिश्रा आणि त्यांच्यातील नातंही संपुष्टात आल्याची चर्चा आहे. पिनाकी मिश्रा यांची कंपनी हॉटेल क्षेत्रात कार्यरत आहे. मिश्रा हे २०१४ मधील देशातील सर्वात श्रीमंत खासदार होते.


पिनाकी मिश्रा आणि महुआ मोईत्रा या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. महुआ मोईत्रा यांचं पहिलं लग्न डॅनिश फायनान्सर लार्स ब्रॉर्सन यांच्याशी झालं होतं. मात्र ते जास्त दिवस टिकलं नाही. मोईत्रा यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९७४ रोजी आसामध्ये झाला होता. त्यांनी इन्वेस्टमेंट बँकर म्हणून करियरची सुरुवात केली होती. मात्र २०१० मध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीमध्ये प्रवेश केला. खासदार महुआ मोईत्रा यांनी जर्मनीत गुपचूप लग्न करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय. राजकारणातले हे दोन दिग्गज आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहेत. त्यांच्या या लग्नाला काहींनी शुभेच्छा दिल्या, तर काहींनी हे लग्न राजकीय की प्रेमाचं? असा खोचक सवाल उपस्थित केलाय. असो. दो दिल जर्मनी में मिले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Comments
Add Comment

भारत-नेपाळ सीमेवर कारवाई; व्हिसा नसल्याने दोन विदेशी नागरिक अटकेत

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा आणि

छत्तीसगडमधील सुकमात चकमक, तीन नक्षलवादी ठार

सुकमा : छत्तीसगडमधील सुकमाच्या जंगलात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत तीन माओवादी

दहशतवादी उमरच्या घरात होता बॉम्ब निर्मितीचा कारखाना

फरिदाबाद : दिल्ली कार स्फोट आणि दहशतवादी उमर यांच्याबाबत नवनवी माहिती हाती येऊ लागली आहे. स्फोट घडवणाऱ्या

तीन दिवसांत 28 काळवीटांचा मृत्यू; कर्नाटक प्राणीसंग्रहालयावर संशयाचे सावट

कर्नाटक : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर राणी चेन्नम्मा प्राणीसंग्रहालयात गेल्या तीन दिवसांत तब्बल 28 काळवीटांचा

गांधीनगर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आधुनिक सुविधांनी होणार सज्ज

सीमा पवार गांधीनगर : जयपूरमधील गांधीनगर रेल्वेस्थानक लवकरच आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे.‘अमृत भारत स्टेशन

पती संभाळ करत असला तरी आई मुलाकडून पालनपोषण खर्च मागू शकते

केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय तिरुवनंतपुरम  : पती जिवंत असेल आणि पत्नीचा सांभाळ करत असला तरीही आई