भारताला पहिले तेजस एमके-१ए जूनमध्येच मिळणार

नाशिक : भारतीय हवाई दलाला पहिले स्वदेशी तेजस एमके-१ए लढाऊ विमान जून २०२५ मध्येच मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यात हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी दर वर्षी २४ या गतीने तेजस एमके-१ए लढाऊ विमानांची निर्मिती करणार आहे. पहिले स्वदेशी तेजस एमके-१ए लढाऊ विमान जून अखेरपर्यंत भारतीय हवाई दलाला मिळेल. भारतीय हवाई दलाने ८३ तेजस एमके-१ए लढाऊ विमानांसाठी हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीशी ४८ हजार कोटी रुपयांचा करार केला आहे.

तेजस एमके-१ए हे हलक्या वजनाचे अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. आकाशातून आकाशात, आकाशातून जमिनीवर तसेच पाण्यावर आणि खोल पाण्यात हल्ले करण्यासाठी तेजस एमके-१ए लढाऊ विमान सक्षम आहे. शत्रूच्या विमानांशी आकाशात लढण्याची वेळ आल्यास तेजस एमके-१ए हे प्रभावी कामगिरी करण्यास सक्षम आहे.

भारताच्या तेजस एमके-१ए लढाऊ विमानात अमेरिकेच्या जीई कंपनीचे इंजिन आहे. या इंजिनांचा भारताला होणार असलेला पुरवठा रखडल्यामुळे मार्चमध्ये होणार असलेला तेजस एमके-१ए लढाऊ विमानांचा पुरवठा आता जून अखेरपर्यंत सुरू होणार आहे.
Comments
Add Comment

शाळेची बस दरीत कोसळली, एकाचा मृत्यू आणि अनेक जखमी

नंदुरबार : शाळेच्या मुलांना घेऊन चाललेली बस अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई घाट परिसरात शे-दिडशे फूट खोल दरीत

ड्रोन दिसताच बोंबाबोंब करणारी शिउबाठा अखेर तोंडावर पडली

मुंबई : शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगर परिसराजवळ ड्रोन उडत असल्याचे आढळले. या

एसटीच्या धडकेने ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी

पुणे : स्वारगेट बस डेपोमध्ये (स्वारगेट बस स्थानक) एक विचित्र अपघात झाला. चालक एसटी मागे घेत होता. ही रिव्हर्सची

आयसिसच्या तीन अतिरेक्यांना अटक, गुजरात ATS ची धडक कारवाई

अहमदाबाद : गुजरात एटीएसने 'आयसिस'शी संबंधित तीन अतिरेक्यांना अटक केली आहे. हे अतिरेकी देशात मोठा घातपात करण्याची

मुंबईत एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना 'दे धक्का'

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची

कर्नाटकमधील मच्छीमारांची महाराष्ट्रात घुसखोरी, सरकारी यंत्रणेची लगेच कारवाई

देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने