French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

  46

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इटलीच्या जॅनिक सिन्नरने फ्रेंच ओपन २०२५ मध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात जॅनिक सिन्नरने नोवाक जोकोविचचा ६-४, ७-५, ७-६ (३) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. रोलँड गॅरोसच्या फिलिप चॅटियर कोर्टवर खेळल्या गेलेल्या सामन्यात जॅनिक सिन्नरने नोवाक जोकोविचचा पराभव केला. सिन्नरने सहाव्या मानांकित जोकोविचविरुद्धचा सामना तीन तास सोळा मिनिटांत जिंकला. सिन्नर सलग तिसऱ्यांदा ग्रँड स्लॅमचा अंतिम सामना खेळणार आहे.

जॅनिक सिन्नर २३ वर्षांचा आहे. हा तरुण गुणी टेनिसपटू रविवार ८ जून २०२५ रोजी अंतिम सामन्यात स्पेनचा जागतिक क्रमांक दुसऱ्या स्थानी असलेल्या कार्लोस अल्काराझ विरोधात खेळणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीने कार्लोस अल्काराझविरुद्धचा सामना अर्ध्यावर सोडला. आठव्या मानांकित मुसेट्टीने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा अल्काराझ ४-६, ७-६ (३), ६-०, २-० ने आघाडीवर होता.

जॅनिक सिन्नर पहिल्यांदाच फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. गेल्या वर्षी त्याला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. सिन्नरच्या नावावर आतापर्यंत तीन ग्रँड स्लॅम जेतेपदे आहेत. त्याने ऑस्ट्रेलियन ओपन दोनदा (२०२४, २०२५) आणि यूएस ओपन (२०२४) एकदा जिंकले. दुसरीकडे, जर अल्काराजने अंतिम फेरी जिंकली तर ते त्याचे दुसरे फ्रेंच ओपन आणि एकूण पाचवे ग्रँड स्लॅम जेतेपद असेल. अल्काराज या २२ वर्षांच्या खेळाडूने आतापर्यंत दोन विम्बल्डन (२०२३, २०२४), एक फ्रेंच ओपन (२०२४) आणि एक यूएस ओपन (२०२२) जेतेपदे जिंकली आहेत.
Comments
Add Comment

मोहम्मद सिराज आयसीसी क्रमवारीत १५ व्या स्थानावर

इंग्लंड मालिकेमुळे सिराजची १२ स्थानाची झेप नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल येथील पाचव्या आणि शेवटच्या

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी

भारतात परतल्यावर मोहम्मद सिराजचे भव्य स्वागत

हैदराबाद : इंग्लंडमधील जबरदस्त प्रदर्शनानंतर स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज बुधवार(दि.६) रोजी हैदराबादमध्ये परतले

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत

नोवाक जोकोविचची ‘सिनसिनाटी ओपन’मधून माघार

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला आगामी यूएस ओपनपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्याने सिनसिनाटी

Team india: इंग्लंड मालिका संपली, आता पुढे टीम इंडियाचे असणार हे वेळापत्रक

मुंबई: इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ २०२५ च्या उर्वरित वर्षासाठी सज्ज झाला