एका क्लिकवर मिळणार जात प्रमाणपत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले संबंधित विभागाला निर्देश


मुंबई:जात प्रमाणपत्र किंवा जातवैधता प्रमाणपत्रासाठी शासकीय कार्यालयांचे चकरा, वेळखाऊ प्रक्रिया आणि कागदपत्रांची डोंगराएवढी झळती यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अक्षरशः नाकीनऊ होते. मात्र, हे चित्र लवकरच बदलणार आहे. कारण, महाराष्ट्र सरकारने जात प्रमाणपत्र ऑनलाइन प्रणालीसाठी हिरवा कंदील दिला असून, लवकरच ही सुविधा प्रत्यक्षात येणार आहे.


राज्य सरकारने मान्यता दिलेल्या या नव्या संगणकीकृत प्रणालीतून अर्जदार एका क्लिकवर जात प्रमाणपत्र मिळवू शकणार आहे. ही प्रणाली पारदर्शक, जलद आणि अत्याधुनिक असेल. यासाठी बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांनी संयुक्तपणे प्रस्तावित प्रणाली विकसित केली आहे. यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी सर्व संबंधित विभागांना आदेश दिले आहेत.


नव्या प्रणालीमधील ठळक वैशिष्ट्ये:




  • एआय आधारित इंटरफेस - अर्जदाराला प्रत्येक

  • टप्प्यावर मार्गदर्शन करणारे स्मार्ट यूजर इंटरफेस.

  • ऑटो पडताळणी - अर्जदाराचे नाव, नातेवाइकांची माहिती आणि आधारवरील पत्ता प्रणालीद्वारे थेट पडताळला जाणार.

  • डीजी लॉकर एकत्रिकरण - कागदपत्रे थेट DigiLocker वरून घेतली जाणार, त्यामुळे वेग आणि विश्वासार्हता वाढणार.

  • विलंबाला चाप - सद्य:स्थितीत महिन्यांपर्यंत चालणारी प्रक्रिया, काही तासांत पूर्ण होण्याची शक्यता.

Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी

मागील ११ वर्षांत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ११० हून अधिक मराठी शाळांना टाळे मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईकरांच्या आरोग्याला महापालिका निवडणुकांचा फटका !

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी दरम्यान, शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई