पंतप्रधान मोदींना कॅनडाकडून जी-७ संमेलनाचे आमंत्रण

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅनडाकडून जी-७ संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी फोन करून मोदींना बैठकीचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे आता कॅनडात होणाऱ्या या संमेलनाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क जे. कार्नी यांच्यात फोनवरून संभाषण झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी कार्नी यांचे निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले. यावेळी कार्नी यांनी पंतप्रधान मोदींनी या महिन्याच्या अखेरीस कॅनडातील कनानास्किस येथे होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले.


याबाबत माहिती देताना पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर लिहिले की, ‘कॅनडाचे पंतप्रधान मार्क जे कार्नी यांच्याशी फोनवरून बोलणं झालं. निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले आणि या महिन्याच्या अखेरीस कनानास्किस येथे होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेसाठी मला आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.’


पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटले की, ‘जिवंत लोकशाही आणि लोकांमधील खोल संबंधांनी जोडलेले भारत आणि कॅनडा परस्पर आदर आणि सामाजिक हितसंबंधांच्या आधारे नवीन ऊर्जेने एकत्र काम करतील. मी शिखर परिषदेत पंतप्रधान कार्नी यांच्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे.’

Comments
Add Comment

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था