मुलगी झाली म्हणून चक्क १५ दिवस उपाशीपोटी डांबून ठेवले, पुण्यात आणखीन एका विवाहितेवर अत्याचार

  69

सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यात मुलगी झाली म्हणून विवाहितेवर अमानुष छळ 


बीड: मुलगी जन्माला आली म्हणून एका महिलेला चक्क 15 दिवस उपाशीपोटी डांबून तिचा छळ केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात राहणारी शिवानी चंदनदिवे या महिलेला मुलगी झाली म्हणून तिच्या सासरच्यांकडून अमानुष छळ सहन करावा लागला. अखेर हतबल आणि निराश होऊन तिने आपल्या तान्हुल्या बाळाला घेऊन बीड येथे आपल्या माहेरचा आसरा घेतला आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत शिवानीने आपल्या सासरच्यांविरुद्ध तक्रार केली आहे.  याप्रकरणी सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मुलगी जन्माला घातली म्हणून अमानुष छळ 


बीड येथील शिवानीचा विवाह पुण्यातील पिंपळा सौदागर येथील आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या निहाल चंदनशिवे याच्यासोबत मोठ्या धूमधडाक्यात झाला. लग्नाचे काही वर्ष चांगले गेले. यादरम्यान शिवानी गर्भवती राहिली आणि तिने मुलीला जन्म दिला. मात्र मुलगी झाली म्हणून शिवानीच्या पतीसह सासू - सासरा आणि दिराने तीचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. शिवानीला एका खोलीत उपाशीपोटी डांबून ठेवण्यात आले. मात्र संधी मिळताचा शिवानीने बाळाला घेऊन सासर सोडले आणि बीड येथे आपल्या माहेरी आश्रयाला गेली.



सासू-सासर्‍यासह पति व दिरावर गुन्हा


या प्रकरणी बीड पोलिसांनी पती निहाल चंदनशिवे, सासू निर्मला, सासरे अरुण चांदशिवेसह दीरावर गुन्हा दाखल केला आहे.  शिवानीसोबत घडलेल्या क्रूर अत्याचार प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी त्वरित कारवाई करण्याचा निर्धार घेतला आहे.


पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताना, आता मुलगी झाली म्हणून एका विवाहितेचा असा अमानुष छळ चक्रावून टाकणारा आहे. या घटनेने सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्याला आणखीन एक कलंक लागला आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राणी मुखर्जीने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, फोटो झाले व्हायरल

मुंबई: 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या चित्रपटासाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

'हिंदूंना बदनाम करण्याचा काही राजकारण्यांचा कट'

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या निवडक नेत्यांनी हिंदूंना बदनाम

मंत्री नितेश राणे उद्या घेणार अश्विनी वैष्णव यांची भेट

कोकण रेल्वे प्रवासी समितीच्या भेटीत समस्यांवर सविस्तर चर्चा  कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची