Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

  91

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या शेवटच्या उड्डाणासह पूर्ण झाली. अंतिम उड्डाणात, एमआय-१७ हेलिकॉप्टरने सैन्याच्या जवानांना पाक्योंग ग्रीनफिल्ड विमानतळावर सुरक्षित पोहोचवले. पाक्योंग येथील जिल्हा माहिती अधिकारी यांच्या माहितीनुसार, शनिवारी ३ एमआय-१७ हेलिकॉप्टरद्वारे एकूण ७६ सैनिकांना पाक्योंग ग्रीनफिल्ड विमानतळावर आणण्यात आले. यानंतर छातेन परिसरातून समन्वय साधून चालवण्यात आलेली ही बचाव मोहीम पूर्ण झाली आहे. शुक्रवारीच उत्तर सिक्किममध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते.



आपत्तीग्रस्त भागांतून सुमारे २००० पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांचा यशस्वीरीत्या बचाव करण्यात आला. शनिवारी सकाळी उत्तर सिक्किममध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्याच्या पार्श्वभूमीवर, २ एमआय-१७ हेलिकॉप्टरने आवश्यक मदत सामग्री घेऊन पाक्योंग विमानतळावरून उड्डाण केले. यामध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाचे पाच अधिकारी तसेच लष्कर व नागरिकांसाठी एकूण १३०० किलो मदत सामग्री पाठवण्यात आली. राज्य सरकार संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून प्रभावित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. उत्तर सिक्किममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे.


परिणामी, वाहतूक व्यवस्था पूर्णतः ठप्प झाली आणि अनेक पर्यटक अडकले. स्थानिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. हवामान सुधारताच हवाई बचाव मोहिमा सुरू करण्यात आल्या. त्याचबरोबर, स्थानिक रहिवासी आणि लष्करी जवानांसाठी आवश्यक वस्तूंची पुर्तता हवाई मार्गाने करण्यात आली. राज्य प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेमुळे अनेकांचे प्राण वाचले असून,या बचाव मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments
Add Comment

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या