IT Engineer Suicide: २५ वर्षीय IT इंजिनीयरने २१ व्या मजल्यावरून उडी घेऊन संपवले जीवन

पुणे : महाराष्ट्रातील हिंजवडी भागात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (वय २५) या आयटी इंजिनीयर युवतीने एका २१ मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे घडली असून, तिने आत्महत्येपूर्वी एक सुसाइड नोट लिहून ठेवली होती.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा बुधवारी पहाटे ४:३० च्या सुमारास हिंजवडी येथील क्राउन ग्रीन्स सोसायटीमध्ये पोहोचली. तेथील CCTV फुटेजमध्ये तिने आपला चेहरा कपड्याने बांधून घेत लिफ्टने २१व्या मजल्यावर जाताना दिसली. त्यानंतर पहाटे ४:४२ वाजता तिने इमारतीवरून खाली उडी घेतली.



अभिलाषाच्या घरी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये काय लिहिले?


पोलिसानी केलेल्या तपासणीत अभिलाषाच्या घरात आत्महत्या पूर्वी तिने लिहून ठेवलेली सुसाईड नोट सापडली, ज्यात "कृपया मला माफ करा. मी हे माझ्या इच्छेने करत आहे. आता जगण्याची काहीच इच्छा राहिलेली नाही." असे लिहिलेले होते. या नोटमध्ये तिने आत्महत्येचे कारण लिहिले नाही. त्यामुळे, नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे,


 


प्राथमिक तपासात काय आढळून आले?


पोलिसांनी  केलेल्या प्राथमिक तपासातून असे स्पष्ट होत आहे की, ती अनेक महीने नैराश्याचा सामना करत होती. मात्र, यासंदर्भात अधिकृत निष्कर्ष पोलीस तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे. अभिलाषा मूळची महाराष्ट्रातीलच असून, IT कंपनीत नोकरी करत होती.



गंभीर दुखापतीमुळे मृत्यू


पोस्टमार्टम अहवालानुसार, तिच्या शरीरातील विविध भागांमध्ये गंभीर दुखापती झाल्या होत्या, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोराट यांनी सांगितले की, याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही संशयास्पद बाब किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी अद्याप तपासात आढळून आलेली नाही. घटनेचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, आरोपीला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

स्कूल व्हॅन मालकाला २४ हजारांचा दंड बदलापूर : बदलापूर शहरात गुरूवारी रात्री चिमुरडीवरील लैंगिक अत्याचाराची

'बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही'

राज ठाकरेंनी व्यक्त केल्या जयंतीदिनी आपल्या भावना मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सत्ता येते जाते. आजचे सत्ताधीश उद्या

दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी उड्डाणपुलाचे काम ७५ टक्के पूर्ण

येत्या ३१ मे २०२६पर्यंत होणार वाहतुकीसाठी पूल खुले मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प

मुंबईत रस्त्यांच्या दुतर्फा विजेच्या खांबावर अनधिकृत बॅनर

मुंबई महापालिकेच्या परवाना विभागात ३ पोलिस ठाण्यात एफआयआर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

विकास गोगावलेंसह एकूण आठ तर हनुमंत जगतापांसह एकूण पाच जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

महाड : महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषदेच्या मतदान केंद्र दोन शाळा क्रमांक पाचच्या बाहेरील