घोडबंदर मार्गावर वाहतुकीत बदल

मेट्रो प्रकल्पाच्या खांबावर गर्डर टाकण्याचे काम हाती


ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान खांबावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी घोडबंदर मार्गावर पुढील चार दिवस मोठे वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान खांबावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी घोडबंदर मार्गावर पुढील चार दिवस मोठे वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. कासारवडवली आणि कापुरबावडी भागात हे काम करण्यात येणार आहे.


त्यामुळे कासारवडवली भागात शुक्रवारी रात्री ११. ५५ वाजता ते शनिवारी सकाळी ५ वाजेपर्यंत आणि कापुरबावडी भागात शनिवार रात्री ११ ते रविवार सकाळी १० वाजेपर्यंत आणि रविवार रात्री ११ ते सोमवार सकाळी ६ वाजेपर्यंत लागू असतील.



कापुरबावडी भागातील बदल


प्रवेश बंद : ठाणे घोडबंदर स्लीप रोडवरुन कापुरबावडी सर्कल मार्गे घोडबंदरचे दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कापुरबावडी सर्कल येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.


पर्यायी मार्ग : सदरच्या मार्गावरुन जाणारी सर्व प्रकारची वाहने ही कापुरबावडी सर्कल येथुन पुला खालुन नळपाडा सिग्नल येथुन उजवीकडे वळण घेऊन, नंदीबाबा चौक, ढोकाळी मार्गे इच्छित स्थळी जातील. सदर मार्गावरुन जाणारी सर्व प्रकारची वाहने ही रवि स्टील नाका येथुन डावे बाजुस वळण घेवुन पोखरण रोड नं.२,गांधी चौक येथून उजवे बाजुस वळण घेऊन खेवरा सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.


प्रवेश बंद : नळपाडयातुन बाहेर येऊन तत्वज्ञान विद्यापीठ मार्गे घोडबंदरचे दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नळपाडा पाईप लाईन येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.


पर्यायी मार्ग : सदर मार्गावरुन जाणारे सर्व प्रकारची वाहने नळपाडा पाईप लाईन येथुन यु टर्न घेऊन नळपाडा येथून इच्छित स्थळी जातील. हे वाहतूक बदल शनिवार रात्री ११ ते रविवार सकाळी १० वाजेपर्यंत आणि रविवार रात्री ११ ते सोमवार सकाळी ६ वाजेपर्यंत लागू असतील.



कासारवडवली भागातील वाहतूक बदल


प्रवेश बंद : ठाणे घोडबंदर वाहिनीवर डोंगरीपाडा येथे स्टिल गर्डर चढवितांना घोडबंदर च्या दिशेने जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना पातलीपाडा उड्डाणपुल उतरणीच्या पुढे ‘प्रवेश बंद’ असेल. ही सर्व प्रकारची वाहने पातलीपाडा उड्डाणपूल उतणीच्या पुढे खुला केलेल्या मध्य दुभाजक कटमधून विरुद्ध दिशेने जाऊन वाघबिळ पुला पूर्वी ओपन केलेल्या कट मधून जाउन पुढे मुख्य रस्त्यामार्गे इच्छित स्थळी जातील.


प्रवेश बंद : ठाणे घोडबंदर वाहिनी वरून विरुद्ध दिशेने स्टिल गर्डरची वाहतुक करतांना पातलीपाडा पुला लगत स्लीप रोडने हिरानंदनी इस्टेटकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना पातलीपाडा ब्रिज चढणी जवळ ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.


पर्यायी मार्ग : ठाणे घोडबंदर वाहिनीवरून विरुद्ध दिशेने स्टिल गर्डरची वाहतूक करतांना हिरानंदनी इस्टेटकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी पातलीपाडा पुलावरून जाउन वाघबिळ पुला खालुन जातील.


प्रवेश बंद : ठाणे घोडबंदर वाहिनी वरून विरुद्ध दिशेने स्टिल गर्डरची वाहतुक करतांना मानपाडा पुळलगत स्लीप रोडने मानपाडा ब्रिज खाली तसेच टिकुजीनीवाडी कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मानपाडा पूल चढणी जवळ ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.


पर्यायी मार्ग : ठाणे घोडबंदर वाहिनी वरून विरुद्ध दिशेने स्टिल गर्डरची वाहतुक करतांना मानपाडा पुला खाली जाणाऱ्या सर्व वाहनांनी पातलीपाडा पुला खालुन तसेच टिकुजीनीवाडी कडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी मुल्ला बाग मार्गे इच्छित स्थळी जातील. हे वाहतूक बदल शुक्रवारी रात्री ११. ५५ वाजता ते शनिवारी सकाळी ५ वाजेपर्यंत लागू असतील.

Comments
Add Comment

आता आधार कार्डची झेरॉक्स बंद!

फक्त डिजिटल पडताळणीसाठी अनिवार्य मुंबई : सरकारने आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेतला असून लवकरच नवीन नियम

एलन मस्क यांचे सॅटेलाईट इंटरनेट भारतात लाँच

भारतात स्टारलिंगचे प्लॅन्स हे ८ हजार ६०० रुपयांपासून सुरू वॉशिंग्टन : प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांची

उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे नियोजन वनराई बंधारे करणार

पंचायत समिती २१ बंधारे, कृषी कार्यालय बांधणार ५० शैलेश पालकर पोलादपूर : उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत

सतत स्क्रीनचा वापर करून डोळे थकले असतील तर न चुकता खा हे आठ पदार्थ, चष्म्याचा नंबरही होईल आपोआप कमी

मुंबई : बदललेल्या जीवनशैलीत लॅपटॉप, मोबाईल यांसारख्या स्क्रीनसमोर तासन्‌तास काम करणे महत्वाचे झाले आहे. याचा

बाणेरमधील आरोपीला दिल्लीतून पाच महिन्यांनंतर अटक

पुणे : बाणेर भागात रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यू प्रकरणी एकाला दिल्लीतून अटक

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त