फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावरुन त्याने आपली निवृत्ती जाहीर केली आहे. पियुष चावला भारताच्या २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता.


‘’क्रिकेटच्या सर्वच प्रकरातून निवृत्त होत आहे. या प्रवासात माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद’’ अशा आशयाची भावनिक पोस्ट इन्स्टाग्राम या सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर लिहीली आहे, दोन दशकांहून अधिक काळ क्रिकेटच्या मैदानावर वेळ घालवल्यानंतर आता या खेळाला अलविदा करण्याची वेळ आली आहे.


भारताचं प्रतिनिधीत्व करण्यापासून ते २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचं सदस्य होणं, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी माझे प्रशिक्षक के.के गौतम आणि स्वर्गीय पंकज सारस्वत यांचा विशेष आभारी असल्याचंही त्याने पुढे म्हटलं आहे.


पियुष चावलाने तीन कसोटी, २५ एकदिवसीय सामने आणि ७ टी-२० सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ७, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३२ आणि टी-२० मध्ये ४ बळी घेतले आहेत. चावलाने भारताकडून डिसेंबर २०१२ मध्ये अखेरचा सामना खेळला होता. तसंच त्याने आयपीएल अर्थातच इंडियन प्रमियर लीगमध्ये पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधत्व केलं आहे. आयपीएलमध्ये विविध संघांकडून खेळताना त्याने १९२ सामन्यात १९२ बळी घेतले आहे. २०२४ मध्ये तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता. मात्र, २०२५ मध्ये त्याच्यावर कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नव्हती.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)