जिजाऊंच्या जन्मस्थळी शिवराज्याभिषेक दिन साजरा

इगतपुरी : शिवराज्याभिषेक हा फक्त सोहळा नसुन ती एक क्रांती आहे. एका मातेच्या संस्कारांनी घडवलेली, मावळ्यांच्या बलिदानाने पावन झालेली, तमाम रयतेच्या मनावर कोरलेली, स्वाभिमानाचं जगणं शिकवणारी, पाच पातशाह्यांच्या छाताडावर पाय ठेऊन उभी राहिलेली, स्वराज्याच्या आसमंतात लिहिलेली, जगातली पहिली क्रांती म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा आहे असे प्रतिपादन कळसुबाई गिर्यारोहक मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांनी केले.


कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी जिजाऊंच्या जन्मस्थळी जाऊन ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन साजरा केला त्या प्रसंगी भगीरथ मराडे बोलत होते. महाराष्ट्र ही शूरवीरांची भूमी, स्वाभिमान इथला बाणा, मातृभूमीच्या व रयतेच्या रक्षणासाठी इथे झुंजले छत्रपती शिवाजी महाराज. रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ही ऐतिहासिक दृष्टीने महत्वाची घटना आहे.


ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ रोजी म्हणजेच इ.स. ६ जून १६७४ रोजी छत्रपतींचा राज्याभिषेक झाला आणि एका सार्वभौम राज्याची घोषणा झाली. महाराष्ट्रातील प्रत्येक गडकोटावर शिवराज्याभिषेक सोहळा दिन साजरा होऊन सर्वच गडकिल्ल्यांचा इतिहास अबाधित राहून पुढील पिढ्यांच्याही स्मरणात रहावा या उद्देशाने गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून इगतपुरी तालुक्यातील कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक शिवकालीन विविध ऐतिहासिक स्थळी शिवराज्याभिषेक सोहळा दिन साजरा करतात.


यावेळी स्वराज्यजननी राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडराजा येथे गिर्यारोहकांनी जाऊन जिजाऊंचा जन्म झालेल्या राजवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या व जिजाऊंच्या मूर्तीचा पंचामृताने अभिषेक करून छत्रपतींचा पेहराव परिधान केलेल्या नामदेव जोशी या युवकाची मिरवणूक काढून जिजाऊ, शिवरायांचा जयघोष करीत ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा दिन मोठ्या उत्साहाने दिमाखात साजरा केला.


या उत्साहात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, इगतपुरी शहराच्या माजी नगरध्यक्षा अलकाताई चौधरी, शाहीर बाळासाहेब भगत, डॉ.महेंद्र आडोळे, नामदेव जोशी, गोकुळ चव्हाण, किसन बिन्नर, संजय शर्मा, सुरेश चव्हाण, रामदास चौधरी, लक्ष्मण जोशी, प्रवीण भटाटे, शांता बिन्नर, सोनल शर्मा, पूजा मालुंजकर आदी महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.

Comments
Add Comment

'Kumbh Bhakti Sangam' : नाशिकमध्ये शुक्रवारपासून कुंभ भक्ती संगम, मुख्यमंत्री करणार उद्घाटन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली

Nashik : मालेगावमध्ये वाद चिघळणार ? टिपू सुलतानच्या प्रतिमेवरून वादाची ठिणगी ; भाजपचा कडक इशारा

Nashik : सहा महिन्यांपूर्वी मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपू सुलतानचे छायाचित्र लावण्यात आले

Nashik : प्रेयसीचा रुसवा घालवण्यासाठी कॉलेजसमोर लावला ‘सॉरी’चा बॅनर, रोमँटिक अंदाजात माफी मागणं पडलं महागात, पुढे घडलं असं काही की...

Nashik : प्रेयसीचा रुसवा घालवण्यासाठी नाशिकमधील एका तरुणाने चक्क कॉलेजसमोर मोठा ‘सॉरी’चा बॅनर लावल्याचा प्रकार

Nashik News : कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ९ हजार ७३१ शेतकऱ्यांना दिलासा

Nashik News : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना

Nashik : कांद्याची दिल्लीवारी ! लासलगावहून ८४० टन कांदा दिल्लीला रवाना होणार

Nashik : देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र

Nashik : नाशिकमध्ये आता काविळीचा प्रकोप ? एकाच इमारतीत निघाले सहा संशयित रुग्ण

Nashik : शहरात पावसाळ्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत असतानाच आता कावीळसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने