प्रहार    

Konkan Railway : कोकणवासीयांसाठी दिलासा! गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची कार 'रो रो' सेवा होणार सुरु

  173

Konkan Railway : कोकणवासीयांसाठी दिलासा! गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची कार 'रो रो' सेवा होणार सुरु

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणा-या रेल्वे रो रो सेवेमधून आता ट्रक प्रमाणे चारचाकी कार गाड्यांची ही रो रो सेवा सुरु करण्याचा विचार कोकण रेल्वे प्रशासनाने सुरु केला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तासाठी दिलासा देणारी बातमी आहे. कोकण रेल्वे कडून गणेशोत्सवापूर्वी रो रो सेवा सुरू केली जाणार आहे. रेल्वेवर स्वताची गाडी चढवून थेट कोकणात जाणे शक्य होणार आहे.


कोकण रेल्वे मार्गावर ज्या प्रकारे रेल्वेकडून ट्रकची वाहतूक केली जाते त्याचप्रमाणे आता कारची देखील वाहतूक करण्यात येणार आहे. तसेच या कारमधून प्रवाशांना प्रवास करणेसुद्धा शक्य होणार आहे. कोकण रेल्वेची ही सेवा गणेशोत्सवात प्रायोगिक तत्वावर मुंबई ते गोवा दरम्यान सुरु करण्याचा विचार कोकण रेल्वे प्रशासन करत आहे.



गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे, महामंडळाच्या बससेवा आणि रेल्वेला ऐनवेळी बुकिंग मिळत नसल्याने मोठी गैरसोय होत असते. त्यामुळे कोकणवासीयांना आणखी एक पर्याय म्हणून कार वाहतूक सुरु झाल्यास कोकणवासीयांना याचा मोठा फायदा होणार आहे.



गणेशोत्सवापूर्वी ही सेवा होणार सुरु


कोकण रेल्वेने वॅगन ट्रकच्या वाहतुकीसाठी तयार करण्यात आले आहेत. मात्र कारच्या वाहतुकीसाठी वॅगन तयार करण्यासाठी काही तात्रिंक बाबींवर काम करण्याची गरज असल्याचे मत कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. येत्या गणपती उत्सवात ही सेवा सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे कोकण प्रशासना कडून सांगण्यात येत आहे. अशाप्रकारची सेवा कोलाड आणि मंगळुरु मार्गावर सुरु आहे. कोलाड येथे वाहनांना रेल्वेत चढविले जाते. अशा वाहनातील चालक, क्लिनर (असल्यास) आणि इतरांना वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा लागतो. मात्र कोकण मार्गावर हा प्रयोग यशस्वी झाल्यास याचा कार वहातुकदार व प्रवाशांना चांगलाच फायदा होणार आहे.


Comments
Add Comment

ऑक्टोबर महिन्यातही रेपो दर कपातीची शक्यता मावळली

SBI Report मधील महत्वाची माहिती समोर प्रतिनिधी: ऑक्टोबर महिन्यात रेपो दर कपातीची शक्यता मावाळली आहे. एसबीआय (State Bank of India SBI)

Suresh Raina Summon ED : सुरेश रैना ईडीच्या जाळ्यात, आज चौकशीसाठी दिल्ली मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार खेळाडू सुरेश रैना याचे नाव बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग प्रकरणात आले

सीएम फडणवीसांच्या प्रयत्नांना मोठे यश महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक होणार !

प्रतिनिधी:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारला आणखी एक यश प्राप्त झाले.

रूपयाचे जागतिक महत्व वाढवण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय

प्रतिनिधी: आरबीआयने भारतीय रुपयाला जागतिक बाजारपेठेत मूल्यवर्धित चलन बनवण्याचे ठरवले. त्यामुळे गुंतवणूकीला

भारतात किरकोळ महागाई २०१७ नंतर रेकॉर्डब्रेक घसरण ! स्वस्ताईचा महापूर?

प्रतिनिधी: भारताची अर्थव्यवस्था सुस्थितीत असल्याचा आणखी एक पुरावा पुढे आला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम

Stock Market: सकाळच्या सत्रात सेन्सेक्स निफ्टी 'इतक्याने' उसळला! 'या' गोष्टींमुळे बाजारात चैतन्य जाणून घ्या सकाळचे सविस्तर विश्लेषण

मोहित सोमण: काल युएस बाजारातील मोठ्या उसळीने बाजारात आज सकाळी आशियाई बाजारात चैतन्य पसरले होते. ज्यामध्ये