Mahavitaran Vardhapan Din : 'शून्य विद्युत अपघाता'चे ध्येय घेऊन काम करावं', महावितरणचे आवाहन

ती दिसत नाही व अजाणताही दुर्लक्ष झाले तरी माफ करत नाही


सतर्क राहा, वीज साक्षर व्हा!


तुमच्या आजूबाजुला ती सतत वावरत असते. मात्र ती दिसत नाही व अजाणताही दुर्लक्ष झाले तरी माफ करत नाही. पावसाळ्याच्या दिवसात तर जास्त धोकादायक ठरू शकते. तीचं नाव आहे वीज. पावसाळी दिवसात वरून सतत पाऊस सुरू असतो. त्यामुळं जागोजागी ओलसर असते. या काळात विद्युत प्रवाहाशी संपर्क आल्यावर दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळं वीज कर्मचारी, शेतकरी, नागरिकांनी विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. कायम सतर्क राहा आणि वीज साक्षर व्हा, असं आवाहन महावितरनाणे केलयं.



पुण्याच्या वारजे परिसरात विजेचा धक्का बसून दहा वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. वारजेतील रामनगर भागात २० मे २०२५ ला संध्याकाळी मयंक प्रदीप आडगळे हा आपल्या घरासमोर खेळत होता. यावेळी त्याचा अनावधानाने विजेच्या खांबाला स्पर्श झाला. अशातच मयंकला तीव्र शॉक बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. अशीच दुसरी घटना १ जून २०२५ रोजी पुण्यामधील नानापेठेत घडली. खांबात उतरलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने आठ वर्षांच्या सायली डंबेचा मृत्यू झाला. नाना पेठेतील डोके तालीम परिसरात सायली खेळत असताना ही घटना घडली. तिच्याबरोबर असलेला एक मुलगाही जखमी झाला. ही ताजी उदाहरणं असली तरी यापूर्वी वीज सेवा क्षेत्रात कार्यरत अनेक महावितरणचे कर्मचारी, कंत्राटी कामगारांचेही वीज धक्क्याने बळी घेतलेले आहेत.


राज्याच्या अनेक ठिकाणी यंत्रणा किंवा मनुष्याच्या निष्काळजीमुळं अशा दुर्घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं अत्यंत धकाधकीच्या सेवा क्षेत्रात काम करताना महावितरणच्या कर्मचार्‍यांनी विद्युत सुरक्षेच्या नियमांचं तंतोतंत पालन करावं. कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघाताचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. आज महावितरणचा विसावा वर्धापनदिन आहे. या निमित्त महावितरनाणे विद्युत सुरक्षा जनजागृतीसाठी सप्ताह साजरा करत आहेत. 'शून्य विद्युत अपघाता'चे ध्येय घेऊन काम करावं, असं आवाहनही या निमित्तानं महावितरणं कर्मचाऱ्यांना केलयं.



कर्मचारी आणि नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत 'या' गाेष्टी कराव्यात



  • नेहमी परवानाधारक इलेक्ट्रिशियनकडूनच विजेचे काम करून घ्या.

  • वायरिंग, प्लग, सॉकेट आणि स्विच वेळोवेळी तपासून घ्या.

  • शॉर्ट सर्किट किंवा धक्का लागल्यास मुख्य स्विच त्वरित बंद करा.

  • लहान मुलांना विजेच्या सॉकेटपासून दूर ठेवा.

  • विद्युत उपकरणांना ग्राउंडिंग/अर्थिंग द्या.

  • आपत्कालीन स्थितीत १९१२ या क्रमांकावर संपर्क साधा.

  • विद्युत अपघात टाळण्यासाठी आरसीसीबी वापरा.

  • आयएसआय मार्क असलेली विद्युत उपकरणे वापरा.

  • कूलरमध्ये पाणी ओतण्यापूर्वी विजपुरवठा बंद करा.

  • शेतकऱ्यांनी कुंपण घालण्यासाठी सरकारने घोषित केलेल्या झटका मशीनचा वापर करा किंवा कायमस्वरूपी कुंपणासाठी बांबू आणि करवंद लागवडीला प्राधान्य द्या.


कर्मचारी आणि नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत 'या' गाेष्टी करू नये



  • कोणत्याही तुटलेल्या किंवा उघड्या वायरला हात लावू नका.

  • विजेच्या उपकरणावर पाणी सांडल्यास ते तत्काळ वापरू नका.

  • जास्त भार टाकणारी उपकरणे एकाच सॉकेटमध्ये लावू नका.

  • स्वतः वायरिंग किंवा दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू नका.

  • कोणतीही धातूची वस्तू सॉकेटमध्ये घालू नका.

  • ओले हात किंवा पायांनी विजेचे उपकरण वापरू नका.

Comments
Add Comment

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Badlapur Dahi Handi 2026 Accident : सातव्या थरावरून सलामी देताना चिमुकल्या गोविंदाचा सेफ्टी बेल्ट तुटला आणि...; बदलापूरमध्ये अनर्थ टळला

बदलापूर : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदलापूरमध्ये एक थरारक घटना घडली. ‘माखन चोर दहीकाला उत्सवा’दरम्यान

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Nisha Bhagat Fraud Case : प्रसिद्ध मराठी लोकगायिकेविरोधात गुन्हा दाखल; सरकारी नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप

कल्याण : प्रसिद्ध मराठी लोकगायिका निशा भगत आणि अनिल आहिरे यांच्याविरोधात सरकारी नोकरीच्या आमिषाने २० लाख रुपये