बांगलादेशमध्ये एप्रिल २०२६मध्ये होणार निवडणूक, मुहम्मद युनूस यांनी केली घोषणा

ढाका: बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद यूनुस यांनी देशातील पुढील राष्ट्रीय निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यांनी शुक्रवारी म्हटले की देशातील पुढील निवडणूक एप्रिल २०२६च्या पहिल्या पंधरवड्यात होणार आहे. ईद-उल अजहाच्या पूर्व संध्येला त्यांनी देशाला संबोधित करताना निवडणुकीची घोषणा केली आहे.


युनूस म्हणाले, निवडणूक आयोग लवकरच एक विस्तृत रोडमॅप जारी करणार आहेत. अंतरिम सरकारने तीन मुख्य उद्देशांसह पदभार सांभाळला होता, सुधारणा, न्याय आणि निवडणूक.


मुहम्मद युनूसने म्हटले की, सरकारने सर्व राजकीय पक्षांना सांगितले आहे की आगामी निवडणूक देशाच्या इतिहासात सर्वात स्वतंत्र, निष्पक्ष,प्रतिस्पर्धी आणि स्वीकारार्ह असली पाहिजे. निवडणुकीबाबत बऱ्याच दिवसांपासून अनेक तारखांबाबत चर्चा केल्या जात होत्या. त्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मुहम्मद युनूस यांनी आधी सल्ला दिला होता की सुधारणांच्या गतीच्या आधारावर डिसेंबर २०२५ आणि जून २०२६ यादरम्यान कधीही निवडणुका होऊ शकतात.



शेख हसीना सरकारचे झाले होते तख्तपालट


गेल्या वर्षी बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. यानंतर ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वातील आवामी लीग सरकारला धक्का दिला होता. शेख हसीना यानंतर भारतात आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण विद्रोहानंतर बांगलादेशातील ही पहिली निवडणूक आहे.

Comments
Add Comment

California Assembly : कॅलिफोर्निया असेंब्लीचा ऐतिहासिक निर्णय; ८ नोव्हेंबरला ‘दिवाळी डे’ साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीने गुरुवारी एक ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर करत यंदा रविवार, ८

Canada Gurdwara Attack : कॅनडातील गुरुद्वारात चाकू हल्ला; दोन जण जखमी, 27 वर्षीय तरुणाला अटक

कॅनडा : कॅनडातील एडमंटन येथील नानकसर गुरुद्वारात शुक्रवारी पहाटे चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या

Pirates kidnap Indians : सागरी चाच्यांचा धुमाकूळ, २२ भारतीयांसह ३० जणांचे अपहरण; येमेन आणि सोमालियाच्या समुद्रातील धक्कादायक घटना

येमेन : येमेन आणि सोमालियाच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सागरी चाच्यांनी दोन व्यावसायिक

China Visa : भारतीयांना व्यावसायिक कामांसाठी चीनला जाणे झाले कठीण

बीजिंग : चीनने भारतीयांसाठी व्यावसायिक व्हिसाच्या नियमांमध्ये बदल के

Imran Khan : इम्रान खान यांना रात्री रुग्णालयात हलवले; वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात पाठवले

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे संस्थापक इम्रान खान यांना रात्री कडक

Mehul Choksi's Lawyer : मेहुल चोक्सीच्या वकिलाच्या अडचणी वाढल्या; लंडनमध्ये लैंगिक अत्याचाराच्या चार आरोपांखाली अटक

लंडन : फरार हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांना ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली असून त्यांच्यावर