'सितारे जमीन पर’चा 'टायटल ट्रॅक' प्रदर्शित आमिर-जेनेलियाची नव्या रंगात 'केमिस्ट्री'

मुंबई : आमिर खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सितारे जमीन पर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकतंच या चित्रपटाचा टायटल ट्रॅक प्रदर्शित करण्यात आला असून, त्यानंतर प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अजूनच उधाण आलं आहे.


या चित्रपटात आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत झळकणार असून, गाण्यात त्याचा आणि लहान मुलांमधील भावनिक नातं सुंदररीत्या दाखवलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात अभिनेत्री जेनेलिया देशमुखसोबत आमिरची नव्या अंगानं साकारलेली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी ठरते.


चित्रपटात १० नवोदित बालकलाकारांनी काम केलं असून, त्यांच्या सादरीकरणामुळे चित्रपटाला एक ताजेपणाचा स्पर्श मिळाला आहे. आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित या चित्रपटाला शंकर-एहसान-लॉय यांचं हृदयस्पर्शी संगीत आणि अमिताभ भट्टाचार्य यांची भावपूर्ण गीतं लाभली आहेत.


‘तारे जमीन पर’ या सुपरहिट चित्रपटाचा हा सामाजिक संदेश असलेला सिक्वल प्रेक्षकांसमोर २० जून २०२५ रोजी चित्रपटगृहात येणार आहे. आता या गाण्यानं चित्रपटाच्या प्रतीक्षेचं वातावरण आणखीच वाढवले आहे.

Comments
Add Comment

बिग बॉस १९' मध्ये मराठी वाघाला जोरदार पाठिंबा!

प्रणित मोरे आणि बसीर-आमल यांच्यातील वादामुळे महाराष्ट्रातून 'कॉमेडियन'ला मोठा सपोर्ट मुंबई: टेलिव्हिजनवरील

‘वेल डन आई’चा धम्माल टीझर प्रदर्शित

आजच्या मॉडर्न युगातील आईची गोष्ट सांगणारा 'वेल डन आई' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज

‘प्रेमाची गोष्ट २’ मधून पुन्हा रंगणार ‘ओल्या सांजवेळी’ची जादू!

सुपरहिट प्रेमकथा सादर करणारे प्रख्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटातील ‘ओल्या

भाईजानने एक्स गर्लफ्रेंड कतरिनाला दिल्या शुभेच्छा?

अभिनेत्री कतरिना कैफ हिने काही दिवसांपूर्वी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. कतरिना आणि विकी लवकरच आई-बाबा

दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट ‘गोट्या गँगस्टर’

‘बाबू बँड बाजा’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक राजेश पिंजानी यांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. मात्र त्यांचे

गौरव मोरेची फिल्टरपाड्याच्या चाळीतून थेट टॉवरमध्ये एन्ट्री !

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमांतून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा