Stock Market Update: गिफ्ट निफ्टी घसरला मात्र सत्राची सुरुवात 'सकारात्मक' सेन्सेक्स ५८.६३ व निफ्टी ९६.३५ अंकांनी उसळला

  53

मुंबई: गिफ्ट निफ्टीच्या नकारात्मक संकेतानंतर पुन्हा बाजारात अस्थिरता कायम आहे. सकाळी प्री ओपन सत्रात सेन्सेक्स ४.८७ अंशाने घसरला होता. सकाळी सत्र सुरू होताना सेन्सेक्स (Sensex) ५८.६३ अंशाने वधारत ८१०५६.८८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० (Nifty ५०) मध्ये ९६.३५ अंशाने वधारत २४७१६.०५ पातळीवर पोहोचला आहे. तरी अखेरच्या सत्रापर्यंत बाजारात मंदीचे सावट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच बाजारात तज्ज्ञांकडून गुंतवणूकीच्या बाबतीत 'सबुरी' बाळगण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना मिळत आहे.काल एकाच सत्रात बाजारात गुंतवणूकदारांनी दोन लाख कोटींची कमाई केल्यानंतर आज तुलनात्मकदृष्ट्या संमिश्र वातावरण कायम राहण्याचीच शक्यता वर्तवली जात आहे.


बीएससी (BSE) बँक निर्देशांक १०५.६२ अंशाने घसरत ६२५९८.३८ पातळीवर तर बीएससी मिडकॅप ०.३१ व स्मॉलकॅप निर्देशांकात ०.६९ टक्क्याने वाढ झाली. एनएससी (NSE) मध्ये बँक निर्देशांक ४१.२५ अंशाने वधारत ५५७४२ अंकावर पोहोचला आहे. मिडकॅप व स्मॉलकॅप मध्ये अनुक्रमे १००.६० अंशाने वाढत २५३४५ पातळीवर पोहोचला आहे. काल परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) १०७६ कोटींची गुंतवणूक केली तर घरगुती संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Domestic Institutional Investors DII) ने २५६६.८२ कोटींची गुंतवणूक केली‌. परंतु जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाणारी अमेरिकेची खाजगी क्षेत्रातील आर्थिक परिस्थितीत सारे काही आलबेल नाही त्यामुळे सगळ्या अमेरिकन शेअर बाजारात मंदी होती.


काल ' प्रहार' ने केलेल्या विश्लेषणाप्रमाणे एनएससी क्षेत्रीय निर्देशांकात (NSE Sectoral Indices) मध्ये हेल्थकेअर, खाजगी व पीएसयु बँक, मिडकॅप व स्मॉलकॅप, फायनाशिंयल सर्विसेस, आयटी समभागात (Shares) मध्ये तेजी पहायला मिळत आहे.


बीएससी (BSE) व एनएससी (NSE) वर न्यूजेन सॉफ्टवेअर (६.९२%), पीएनसी इन्फ्राटेक (६.५९%),फॅक्ट (५.५३%), जेएसडब्लू इन्फ्रा (३.७%), इटर्नल (३.५१%), डॉ रेड्डीज (२.५८%), सिप्ला (१.६८%), रिलायन्स (१.३६%), ग्रासीम (१.२५%), अदानी पोर्टस (१.२४%), एम अँड एम (०.९५%) या समभागात वाढ झाली असून इंद्रप्रस्थ गॅस (१.७७%), एमएमटीसी (१.६१%), कोचीन शिपयार्ड (१.५१%), हुडको (१.५१%), डिक्सन टेक्नॉलॉजी (१.०९%), बजाज फायनान्स (०.६९%), एक्सिस बँक (०.३३%), इंडसइंड बँक (०.२३%), भारती एअरटेल (०.१७%), श्रीराम फायनान्स (०.११%), हिंदाल्को (०.०७%), टेक महिंद्रा (०.०३%), नेस्ले (०.०१%) समभागात घट दिसून आली आहे.


काल जाहीर झालेला अमेरिकेचा मॅक्रो डेटा देखील कमकुवत होता, ज्यामुळे फेडच्या दर कपातीच्या मुद्द्याला बळकटी मिळाली, परंतु त्याचा वॉल स्ट्रीटवरील अर्थकारणावर परिणाम झाला असे म्हणावे लागेल. आजच्या स्थितीत गुंतवणूकदारांचे लक्ष उद्या जाहीर होणाऱ्या रेपो दराकडे लागले आहे. तरी दिवसभर आज बाजारात काय संकेत मिळतील त्यासाठी दुपारची प्रतिक्षा करावी लागेल.

Comments
Add Comment

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने जोडप्यावर हल्ला : आई आणि भावाने केले मुलीचे अपहरण

पुणे : खेड तालुक्यातील खरपुडी गावात आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यावर हल्ला करत पत्नीचे अपहरण करण्यात आले आहे.

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर विक्रीत जुलैत 'इतकी' वाढ

मागील महिन्याच्या तुलनेत कंपनीच्या एकूण विक्रीत २०% वाढ झाली मुंबई: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर विक्रीत मागील

अदानी समुहाने 'या' अहवालावर व्यक्त केली नाराजी

प्रतिनिधी: अदानी समुहाने ब्ल्यूमबर्गच्या अहवालाला सपशेल नाकारल्याने ही अफवा होती का हा प्रश्न निर्माण होणे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील