दिल्लीतील कोर्टाच्या लॉकअपमध्ये कैद्याची हत्या

नवी दिल्ली : दिल्ली येथील साकेत कोर्टाच्या लॉकअपमध्ये कैद्याची हत्या झाल्याची खळबळजनक घटना आज घडली. अन्य दोन कैद्यांनी अमन नावाच्या कैद्याची हत्या केली. दोघेही तिहार तुरुंग क्रमांक ८ मध्ये कारावासाची शिक्षा भोगत होते. दोघांनाही न्यायालयीन कामकाजासाठी साकेत न्यायालयात आणण्यात आले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे.


दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या प्रकरणी अटकेत असणार्या दोघांना न्यायालयीन कामकाजासाठी साकेत न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी त्यांना साकेत कोर्टाच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. साकेत कोर्ट लॉकअपच्या खारजा क्रमांक ५ मध्ये मारहाणीची घटना घडली. एका अमनला न्यायालयात हजर करण्यासाठी लॉकअपमध्ये आणण्यात आले होते. जितेंद्र आणि जयदेव या कैद्यांनी अमनवर हल्ला केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.


२०२४ मध्ये तुरुंगाबाहेर असताना झालेल्या मारहणाीच्या घटनेमुळे जितेंद्र आणि अमन यांच्यात जुना वैमनस्य होते. अमनने जितेंद्र आणि त्याच्या भावावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप होता. याच पूर्ववैमनस्यातून जितेंद्र आणि जयदेव या कैद्यांनी अमनवर हल्ला केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला, असा प्राथमिक माहिती दिल्ली पोलिसांनी दिले होते.

Comments
Add Comment

सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आग! नेमकं कारण काय?

बीड: एखाद तान्ह बाळ जन्माला आल्यापासून त्याची सर्व निगा राखायची, वाढ पाहायची, आपल्यासोबत खुलताना त्याला जवळ

पुष्कर जोगच्या घराला आग! मदतीसाठी सोशल मीडीयावर पोस्ट

मुंबई: संपूर्ण देशात ख्रिसमस सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे मराठी सिनेक्षेत्रातील

संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?

नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण

रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद

जेष्ठ गायिका उत्तरा केळकर मुंबई : महान गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी

'वेलकम ३'चे शूटिंग संपले , वेगवेगळ्या लूक मध्ये दिसणार अक्षय कुमार

Welcome 3 : बॉलिवूडच्या वेलकम ३ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एक महत्त्वाची

लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाचा मोठा निर्णय

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे