शिवराज्याभिषेक सोहळा यशस्वितेसाठी नियोजन करावे

विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले निर्देश


अलिबाग : शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे दुर्गराज रायगड येथे तारखेनुसार ६ जून व तिथीनुसार ९ जून रोजी आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळा साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याने येथील कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांची लाखोच्या संख्येने उपस्थिती होणार असल्याने या कार्यक्रमांची पूर्वतयारी करताना संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.


रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळा २०२५ च्या आनुषंगाने नियोजन बैठक नुकतीच पार पडली, त्यावेळी विभागीय आयुक्त सूर्यवंशी बोलत होते. सूर्यवंशी पुढे म्हणाले, शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक रायगडावर येत असतात. यावर्षी होणाऱ्या या कार्यक्रमांसाठी आयोजकांकडून तयारी केली जात असून, मागीलवर्षी सुरक्षा व पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला होता. हा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी कोणतीही समस्या उद्भवू नये, यादृष्टीने आवश्यकत्या सुविधा निर्माण करण्यासाठी पूर्वतयारी केली जावी.


येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता, तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी असे विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सूचित केले, तसेच महाड व माणगावमार्गे येणाऱ्या खासगी वाहनांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यांची कामे, पार्किंगच्या जागा व तेथून गडाकडे जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था संबंधित विभागांनी पूर्ण करावे, आवश्यक माहिती देणारे फलक लावले जावेत असेही डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले. बैठकीस जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रवींद्र शेळके, यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वाहतूक सुरू, पहिल्या विमानाचं जोरदार स्वागत

पनवेल : रायगड जिल्ह्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून (गुरुवार २५ डिसेंबर २०२५)

सिडको-नैना क्षेत्रातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन

पनवेल तालुक्यातील ४६ गावांचा प्रश्न मार्गी लागणार पनवेल : पनवेल तालुक्यामधील सिडको व नैना अधिसूचित क्षेत्रातील

कर्जतमध्ये सुधाकर घारे यांचे जोरदार कमबॅक

नितीन सावंतांना सोबत घेऊन थोरवे आणि लाड यांना धक्का कर्जत : येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत परिवर्तन विकास

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित

विकासकामांना ग्रामस्थांनी निवडले रुपेंद्र मळेकर रोहा : रोहा नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या चुरशीच्या झालेल्या

उबाठाशी युती राष्ट्रवादीच्या फळाला आली

मुरुडकरांनी जुन्यांना नाकारले तरुणांकडे धुरा! उदय खोत नांदगाव मुरुड : मुरुड नगरपरिषदेची निवडणूक

आपली पोरं सांभाळू शकले नाहीत, ते मुंबई काय सांभाळणार?

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली