एमएमआरडीने हरित वाटचालीत गाठला महत्त्वाचा टप्पा

जागतिक पर्यावरण दिनी दोन मेट्रो मार्गिकांना मिळाले कार्बन-न्यूट्रल प्रमाणपत्र


मुंबई  : जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) पर्यावरण शाश्वततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एका विशेष सोहळ्यात मुंबई मेट्रो २ए आणि ७ या मार्गिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्बन न्यूट्रॅलिटी आणि कार्बन क्रेडिट प्रमाणपत्रे औपचारिकरित्या प्रदान करण्यात आली. या सोहळ्यासाठी मुख्य सचिव, सुजाता सौनिक, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ.संजय मुखर्जी आणि महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक, रुबल अगरवाल हे मान्यवर उपस्थित होते.


या ऐतिहासिक कामगिरीतून मेट्रो २ए आणि ७ या मार्गिका कार्बन-न्यूट्रल कॉरिडॉर असल्याचे अधोरेखित होते आणि हरित व शाश्वत नागरी वाहतुकीकडे वाटचाल करण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना यामुळे अधिक चालना मिळते.एमएमएमओसीएलने या मार्गिकांची कार्बन न्यूट्रॅलिटी तपासण्यासाठी तृतीयपक्षीय लेखापरीक्षण सुरू केले होते. या लेखापरीक्षणामध्ये या मार्गिका पीएएस २०६०:२०१४ या आंतरराष्ट्रीय मानकानुसार कार्बन न्यूट्रल असल्याचे स्पष्ट झाले.


याशिवाय, 'मेट्रो २ए मार्गिका आणि मेट्रो ७ मार्गिकांसाठी वाहतूक पद्धतीतील परिवर्तन' या प्रकल्पासाठी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२४ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी युनिव्हर्सल कार्बन रजिस्ट्रीने एमएमएमओसीएलला ८५,८४९ कार्बन ऑफसेट युनिट्स जारी केली आहेत. पुढील टप्प्यात, एमएमआरडीएने मेट्रो २बी, ४, ४ए, ५, ६, ७ए आणि ९ या बांधकामाधीन मार्गिकांची VEERA कार्बन रजिस्ट्रीत नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.


ही संस्था हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक स्तरावरील प्रमुख मानक मानली जाते. हे पाऊल उचलल्याने हवामान बदल लक्षात घेऊन राबवली जाणारी पर्यावरणपूरक शहरी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात मुंबई हे देशातील आघाडीचे शहर म्हणून पुढे येत आहे. कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणजे वातावरणात सोडल्या जाणाऱ्या कार्बनचे प्रमाण व त्याची भरपाई करणाऱ्या प्रकल्पांमधून मिळणारे कार्बन क्रेडिट्स यांच्यात संतुलन साधणे. यामुळे एकूण कार्बन उत्सर्जन 'शून्य' होते. मेट्रो सेवा चालवताना होणाऱ्या उत्सर्जनात प्रामुख्याने वीज वापरामुळे होणाऱ्या उत्सर्जनाचा समावेश होतो.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : गर्भवती मातांसाठी मोठी दिलासादायक बातमी; तीव्र रक्तक्षयावर उपचारांना मिळणार वेग

तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Major decision by MHADA : उमरखाडीतील १,९२८ रहिवाशांना मिळणार ५०० चौरस फुटांची हक्काची घरे!

मुंबई : भायखळा येथील ऐतिहासिक आणि दाट वस्तीच्या उमरखाडी परिसराचा समूह पुनर्विकास करण्याचा अत्यंत महत्त्वाचा

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य