सर्वात कमी वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळावर जसलोक हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

ट्रॅकिओ-इसोफॅजियल फिस्टुला या दुर्मीळ जन्मजात समस्येने ग्रस्त बाळाचे वाचवले प्राण !

 

मुंबई: जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने एका दुर्मीळ आणि गंभीर प्रकरणात शस्त्रक्रिया आणि अतिदक्षता व्यवस्थापनाद्वारे ३० आठवड्यांच्या अकाली जन्मलेल्या १.३ किलोग्रॅम वजनाच्या आणि टाईप सी ट्रॅकिओ-इसोफॅजियल फिस्टुला (TEF) या दुर्मीळ जन्मजात समस्येने ग्रस्त असलेल्या बाळावर यशस्वी उपचार केले. या जन्मजात समस्येमुळे श्वासनलिका आणि अन्ननलिकेमध्ये असामान्य जोड निर्माण होते, ज्यामुळे जास्त लाळ येणे, गुदमरणे तसेच फुफ्फुसांचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. वैद्यकीय टीमने एकाच टप्प्यातील शस्त्रक्रिया आणि नंतर इसोफॅजियल डायलटेशन केली. ही प्रक्रिया अशा नाजूक प्रकरणात प्रथमच यशस्वी झाली आहे. बहुविशेषज्ञ टीमच्या समन्वित प्रयत्नांमुळे बाळ आता स्थिर असून फक्त आईचे दूध घेत आहे. बाळाचे वजन १.८ किलो झाले आहे आणि लवकरच त्याला घरी पाठवण्यात येईल.

वापी, गुजरात येथे जन्मलेल्या या बाळाला या समस्येमुळे जीवघेण्या अडचणींना सामोरे जावे लागले. पालकांनी जसलोक हॉस्पिटलचे बालरोग विभागप्रमुख डॉ. फजल नबी यांच्याशी उच्चस्तरीय उपचारांसाठी संपर्क साधला. प्रकरणाच्या गंभीरतेचा विचार करून डॉ. नबी स्वतः वापीला गेले आणि बाळाला कृत्रिम श्वसनासह त्यांच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे जसलोक हॉस्पिटलमध्ये आणले. बाळाला तत्काळ बालरोग अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले, जिथे डॉ. फजल नबी यांनी उपचारांची जबाबदारी घेतली. त्यावेळी बाळ व्हेंटिलेटरवर होते, इनोट्रोप्ससह हेमोडायनामिक स्टॅबिलायझेशन करण्यात आले आणि सेप्सिसवरील उपचार सुरू करण्यात आले.

यानंतर प्रसिद्ध बालशल्यचिकित्सक डॉ. नार्गिश बारसिवाला यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली. त्यांनी बाळ स्थिर झाल्यावर एकाच टप्प्यातील शस्त्रक्रिया करणे उचित असल्याचे सांगितले. तिसऱ्या दिवशी, डॉ. बारसिवाला यांनी फिस्टुला लिगेशन आणि इसोफॅजियल अ‍ॅनास्टोमोसिससह वन-स्टेज करेक्टिव्ह सर्जरी केली. त्यानंतर बाळाला पुन्हा अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आले. शस्त्रक्रियेनंतरच्या काळात टीमला आतड्यांच्या हालचालींबाबत आणखी एक समस्याला सामोरे जावे लागले. प्रीमॅच्युरिटी आणि कमी वजनामुळे आतड्यांची हालचाल व्यवस्थित होत नव्हती. बाळाला एनजी ट्यूबद्वारे दूध देण्यात आले आणि काही प्रमाणात टोटल पॅरेन्टेरल न्यूट्रिशन दिले गेले. त्याला गिळण्यासही अडचण होत होती. साधारणतः एक महिना एनजी ट्यूबद्वारे फीड देण्यात आले आणि नंतर फीडिंग गॅस्ट्रोस्टोमीचा निर्णय घेण्यात आला व एनजी ट्यूब काढण्यात आली.

तथापि, एका महिन्यानंतरही बाळाला गिळण्यास अडचण येत होती. ही अडचण दूर करण्यासाठी गॅस्ट्रोस्टोमी प्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयाच्या टीमने सर्वात छोटा उपलब्ध डायलटेर वापरून उच्च-जोखमीची इसोफॅजियल डायलटेशन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही नाजूक प्रक्रिया जसलोक हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी सल्लागार डॉ. पंकज धवन यांनी पार पाडली. या प्रक्रियेमध्ये बालरोग अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. फजल नबी, डॉ. बारसिवाला आणि भूलतज्ज्ञ टीमचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. हळूहळू बाळ स्वतः गिळू लागले आणि अखेरीस एनजी ट्यूब काढण्यात आली.

डॉ. फजल नबी, संचालक, बालरोग विभाग, जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर म्हणाले, “ जेव्हा बाळ आले तेव्हा ते अत्यंत नाजूक आणि कमकुवत होते. त्याला तातडीच्या उपचारांची गरज होती. स्थिरीकरणापासून शस्त्रक्रियेनंतरच्या गुंतागुंतींच्या व्यवस्थापनापर्यंत, प्रत्येक पायरी काळजीपूर्वक नियोजित करावी लागली. इसोफॅजियल डायलटेशन हे विशेषतः आव्हानात्मक होते, पण आमच्या टीमने उत्तम समन्वयाने हे साध्य केले. आता बाळ स्वतः फीड घेत आहे आणि घरी जाण्यास तयार आहे."

डॉ. नार्गिश बारसिवाला, सल्लागार, बालशल्यचिकित्सा, जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर म्हणाल्या, “ १ किलोपेक्षा थोडे जास्त वजन असलेल्या अकाली बाळावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत कठीण असते. ऊती अत्यंत नाजूक असतात, आणि चूक झाली तर जीव धोक्यात येऊ शकतो. मात्र परिस्थिती अशी होती की प्रतीक्षा शक्य नव्हती. आम्ही सिंगल-स्‍टेज करेक्टिव सर्जरी करण्याचा निर्णय घेतला, जोखीम माहिती असूनही, दीर्घकालीन फायद्यांचा विचार केला. यशस्वी निकाल अचूक शस्त्रकौशल्यामुळे, भूलतज्ज्ञ डॉ. रजनी प्रजीश, डॉ. कोटवाला आणि शस्त्रक्रिया निवासी डॉक्टरांच्या सहाय्यामुळे शक्य झाला.”

कृतज्ञता व्यक्त करताना बाळाची आई श्रीमती त्रुप्ती म्हणाल्या, “ माझं बाळ हे ८ वर्षांच्या लग्नानंतर आयव्हीएफद्वारे झालं आणि आमच्यासाठी खूपच अनमोल आहे. अकाली आणि इतकं नाजूक बाळ जन्मल्यावर मी खूप घाबरले होते. पण जसलोक हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उपचारांनी आणि सहवेदनेने आम्हाला आशा मिळाली. मला विश्वास आहे की त्यांच्या कौशल्याशिवाय आणि सेवाभावाशिवाय माझं बाळ आज इथे नसतं.”

सध्या हे कुटुंब घरी बाळाची काळजी घेण्यासाठी सर्व मार्गदर्शन घेत आहे, ज्यामध्ये सुरक्षित फीडिंग पद्धती, औषधांचे वेळापत्रक आणि महत्त्वाची चेतावणी चिन्हे यांचा समावेश आहे.
Comments
Add Comment

Big Boss Marathi Season 6 : बिग बॉस मराठी ६ मध्ये आयुषच्या विषयावरून तन्वीची खरडपट्टी; प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : बिग बॉस मराठी ६ मध्ये सातव्या आठवड्यात ड्रामा, आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक उद्रेक यांचा जोर वाढला आहे.

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

श्रद्धेच्या सान्निध्यातील शाश्वततेचा भव्य संकल्प ‘निसर्गायण’

टिटवाळा ठरणार पर्यावरण –पर्यटनाचे नवे केंद्र कल्याण : श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

The Epstein Files : डोनाल्ड ट्रम्पच्या आरोपांशी संबंधित रेकॉर्ड रोखल्याबद्दल एफबीआय चौकशी करणार

अमेरिकेचा न्याय विभाग जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित असलेली काही कागदपत्रे चुकवून सार्वजनिक होण्यापासून

Bigg Boss Marathi : राकेश बापटने तन्वीला केलं किस; राखी सावंत भडकली आणि ....

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये राखी सावंत आल्यापासून रोज नवनवीन ड्रामा पाहायला मिळतो. राखी सावंतची