Gold Rate Today: सलग चौथा दिवशी सोन्याचा बोलबाला! सोन्याचांदीचे भाव गगनाला भिडले

प्रतिनिधी: सलग चौथ्या दिवशी सोन्याचा बोलबाला स्पष्ट झाला आहे. आज पुन्हा एकदा सकाळी सोन्याच्या भावात थेट ४३ रूपये प्रति ग्रॅम भाववाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय दबाव, अमेरिकेतील ढासळलेले खाजगी क्षेत्र, डॉलरच्या किंमतीत घट, आंतरराष्ट्रीय बाजारातील आर्थिक अनिश्चितता, वाढलेली सोन्यातील गुंतवणूक अशा अनेक कारणांमुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

'गुड रिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २४ कॅरेट प्रति ग्रॅम दरात ४३ रूपयांनी वाढ होत तोळ्याची किंमत ९९६०० रूपयांवर पोहोचली आहे तर २२ कॅरेट सोने प्रति ग्रॅम किंमत ४० रुपयांनी वाढत ९१३० रूपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे एक तोळयाची किंमत ९१३०० रूपयांवर पोहोचली आहे. तर १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ३२ रूपयांनी वाढत ७४७० रुपयांवर पोहोचला तर तोळा किंमत ७४७०० रूपयावर पोहोचली आहे.

चांदीच्या किंमतीतही प्रति ग्रॅम २ रूपयांची वाढ होत प्रति किलो चांदीची किंमत १०४००० रूपयांवर पोहोचली आहे.एप्रिलमध्ये या मौल्यवान धातूची किंमत १ लाख रुपयांपेक्षा जास्त या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. तथापि, मे महिन्याच्या पहिल्या सहामाहीत किमती कमी झाल्या आणि महिन्याच्या दुसऱ्या सहामाहीत मात्र सोन्याचांदीच्या दरात वाढ झाली आहे. तथापि एमसीएक्स (MCX) वर सोन्याच्या निर्देशांकात ०.३६ टक्क्याने घट होत सोन्याची पातळी ९८२२६.०० वर पोहोचली असून चांदीच्या निर्देशांकात ०.१२ टक्क्याने वाढ होत १०१५००.०० पातळीवर चांदी पोहोचली आहे.

अमेरिकन बाजारातील मंदी व सोने दरवाढीनंतर आता भारतात, अर्थतज्ज्ञ ४ जून रोजी सुरू झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीची आतुरतेने वाट पाहत असतील. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली होणारी आरबीआय एमपीसी बैठक शुक्रवार ६ जून रोजी संपेल. यावरून सोन्याचीही पुढील दिशा स्पष्ट होईल.

 
Comments
Add Comment

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे

कल्याण-डोंबिवलीत ४०.०७ टक्के मतदान

मतदानाचा टक्का घसरला; दुपारी वेग वाढला कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेत