श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके मॅच फिक्सिंगमध्ये दोषी

कोलंबो - श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके याला मॅच फिक्सिंगसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. २०२० मध्ये लंका प्रीमियर लीगमध्ये त्याने सहकारी खेळाडूला फिक्सिंगसाठी प्रलोभन दिल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्याला अटक झाली होती, पण २०२३ मध्ये जामिनावर सुटका झाली. आता या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर सेनानायके मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला आहे.


श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायके याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप लागल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. आता हंबनटोटा हायकोर्टाने त्याला मॅच फिक्सिंगमध्ये दोषी ठरवले आहे. लंका प्रीमियर लीगमध्ये त्याने एका सहकारी खेळाडूला फिक्सिंगसाठी प्रलोभन दिल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे.


अटॉर्नी जनरलच्या विभागाने सांगितले की, श्रीलंकेत अलीकडेच लागू झालेल्या भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटूवर मॅच फिक्सिंगसाठीचा हा पहिलाच खटला आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सेनानायकेने कोलंबो किंग्सकडून खेळणाऱ्या थारिंदु रत्नायकेला फिक्सिंगची ऑफर दिली होती.


२०१४ साली श्रीलंकेने आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकला तेव्हा त्या विजयी संघात सचित्रा सेनानायके यांचा समावेश होता. ४० वर्षीय सेनानायके यांनी २०१३ ते २०१६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. या काळात त्यांनी श्रीलंकेकडून ४९ एकदिवसीय आणि २४ टी-२० सामने खेळले. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी ५३ विकेट्स घेतल्या, तर टी-२० मध्ये त्यांनी २५ विकेट्स आपल्या नावावर केल्या. तो आयपीएल स्पर्धेतही खेळला आहे. २०२३ च्या हंगामात तो केकेआर संघाचा सदस्य होता.

Comments
Add Comment

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या

ग्रँड स्लॅम ४०० व्या विजयाच्या उंबरठ्यावर नोव्हाक जोकोविच!

ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मेलबर्न : टेनिस जगतातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या नोव्हाक