‘होल्डिंग पाँडचे काम लवकरात लवकर करा’

आमदार मंदा म्हात्रे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना


नवी मुंबई :नवी मुंबईमधील बेलापूर विभागातील सेक्टर १२ येथे असलेले सिडको निर्मित पावसाळी जलउदंचन केंद्र (पंप हाऊस) हे गेले ३५ ते ४० वर्षे जुने असून त्याचे भूमिपूजन होऊन देखील वर्ष झाले तरी काम पूर्ण न झाल्याने अवकाळी पावसामुळे नवी मुंबईत व विषेशत: सीबीडी बेलापूर विभागात सेक्टर ४,५,११ येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच काल सुद्धा अवकाळी पावसाने पुन्हा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आ.


म्हात्रे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील व सीबीडी येथील व्यापारी तसेच महापालिका शहर अभियंता शिरीष आरदवाड व इतर संबधित अधिकाऱ्यांसमवेत बेलापूर येथील होल्डींग पाँडचा पाहणी दौरा केला. पाहणी दौऱ्यासंदर्भात आ. म्हात्रे यांनी सदर होल्डींग पाँडचे काम लवकरात लवकर केले नाही तर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, असे आदेश उपस्थित महापालिका अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर अवकाळी पावसाने जी परीस्थिती महाराष्ट्रभर उद्भवली तशी नवी मुंबईत येवू नये याकरिता प्रथम खबरदारी घ्यावी असे आदेश पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.त्या पुढे म्हणाल्या की, गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र पाण्याखाली गेले होते.


परंतु काही समाजकंटकांनी बेलापूर विभाग पाण्याखाली गेला असल्याची बातमी प्रसारित केली. त्याचबरोबर होल्डींग पाँडचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. परंतु होल्डींग पाँडच्या परिसरात जे अतिक्रमण केले गेले आहे. त्या अतिक्रमणावर येत्या ४ दिवसात कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Comments
Add Comment

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ फलकावरून वाद

नामकरणावरून राजकारण : गेल्या अनेक वर्षांपासून या विमानतळाच्या नामकरणावरून राजकारण सुरू आहे. दि. बा. पाटील

सर्पदंश झालेल्या मावशीचाही उपचारादरम्यान मृत्यू!

मृतांच्या नातेवाइकांचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन कल्याण (वार्ताहर) : साडेचार वर्षांच्या

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘डीजीसीए’कडून परवाना

उद्योजक गौतम अदानी यांच्याकडून पाहणी नवी मुंबई : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला (एनएमआयए) नागरी विमान

नवी मुंबईसह सर्व महापालिकांवर महायुतीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार

नवी मुंबई : नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेली घरे आपण नियमित करण्याचा निर्णय घेतला. सिडकोच्या घरांच्या किमती कमी

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव!

केंद्राला प्रस्ताव पाठविल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Central Railway : मध्य रेल्वेचा 'मास्टरप्लॅन'! सीवूड्स-उरण मार्गावर २० नव्या लोकल धावणार, ऑक्टोबरपासून प्रवास होणार सुपरफास्ट

नवी मुंबई : सिवूड्स दारावे-बेलापूर-उरण या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी एक अत्यंत