जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा अडीचपट कैदी

प्रशासनावर कामाचाताण; यंत्रणा अपुरी


अलिबाग  :रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारीत वाढ झाल्याने कैद्यांना ठेवण्यासाठी अलिबागचे जिल्हा कारागृह अपुरे पडू लागले आहे. ८२ कैद्यांना ठेवण्याची क्षमता असणाऱ्या जिल्हा कारागृहात सध्या २०२ कैदी दाटीवाटीने ठेवण्यात आले आहेत. यामुळे कैद्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, कारागृह प्रशासनावरही कामाचा ताण पडत असून, यंत्रणा अपुरी पडत आहे.


अलिबाग शहरातील हिराकोट किल्ल्याचे रूपांतर जिल्हा कारागृहात करण्यात आले आहे. या कारागृहात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींना ठेवण्यात येते. या कारागृहात ८० पुरुष व २ महिला असे ८२ कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र जिल्ह्यात वाढत्या गुन्ह्यांमुळे हे कारागृह कमी पडत आहे. जिल्ह्यात दररोज ८ ते १० गुन्हे घडत आहेत. यामुळे न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आोपींच्या संख्येतही वाढ होत आहे. सध्या जिल्हा कारागृहात १९१ पुरुष व ११ महिला कैदी असे एकूण २०२ कैदी ठेवण्यात
आले आहेत.


कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने कैद्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. कोंडत वातावरण, खोल्यांमध्ये दाटीवाटीने राहावे लागत आहे. शौचालय, तसेच स्नानगृहांची कमतरताही भेडसावत आहे. याचबरोबर प्रशासनावरही ताण पडत आहे. ८२ कैद्यांसाठी पूरक असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना २०२ कैद्यांवर लक्ष ठेवावे लागत आहे. जिल्हा कारागृहात केवळ दोन महिला कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र सद्यस्थितीत कारागृहात ११ महिला कैदी आहेत.


या सर्व ११ महिला कैद्यांसाठी केवळ एक बराक असून या बराकीत दाटीवाटीने त्यांना राहावे लागत आहे, तसेच महिला कैद्यांसाठी केवळ एक स्नानगृह आहे. यामुळेही महिला कैद्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुरुष कैद्याचीही अशीच परिस्थिती आहे. १९२ कैद्यांना एक मोठी बराक, तसेच ८ छोट्या खोल्यांमध्ये दाटीवाटीने ठेवण्यात आले आहे.


हिराकोट किल्ल्याचे रुपांतर कारागृहात करण्यात आले आहे. यामुळेही कारागृह प्रशासनाला अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागत आहे. किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे. यामुळे कारागृहात काही काम करावयाचे असल्यास पुरातत्त्व विभागाची परवानगी लागते. तसेच किल्ल्याच्या मूळ बांधकामाला कोणताही धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी लागत आहे.

Comments
Add Comment

'हायटेक केसपेपर नोंदणी' ठरतेय डोकेदुखी !

अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या लांब रांगा अलिबाग  : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये आयुष्मान

महाडमध्ये वृद्ध महिलेची हत्या; २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश

महाड : महाड तालुक्यातील नाते येथे ७५ वर्षीय लीलावती राजाराम बलकवडे यांची शेतातील वाड्यावर हत्या करून सोन्याचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पेण दौरा रद्द

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील नगरपालिकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रचाराकडे सर्वच

सांडपाण्यामुळे कुंडलिका नदीचे पाणी प्रदूषित

रोहा : रोहा परिसरातील जीवनरेखा मानली जाणाऱ्या कुंडलिका नदीत धाटाव एमआयडीसी परिसरातून सोडल्या जाणाऱ्या

रेवस - रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या कामाला गती

नव्या रेवदंडा - साळाव पुलासाठी १२५० कोटींचा निधी मंजूर अलिबाग : रेवस-रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या

दहा नगरपालिका हद्दीत मद्यविक्रीला ३ दिवस बंदी

नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर प्रशासनाचे निर्देश अलिबाग : निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार