भारतात तयार होणार राफेल लढाऊ विमानाचे सुटे भाग

नवी दिल्ली : राफेल उत्पादक दसॉल्ट एव्हिएशनने भारत आणि इतर जागतिक बाजारपेठांसाठी लढाऊ विमानांचे सुटे भाग तयार करण्यासाठी टाटा समुहासोबत भागिदारी करार केला आहे. लवकरच हैदाराबादमध्ये एक कारखाना उभारून त्याद्वारे राफेल लढाऊ विमानाचे सुटे भाग तयार केले जातील.

दसॉल्ट एव्हिएशन आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड यांनी भारतात राफेल लढाऊ विमानांच्या सुट्या भागांचे उत्पादन करण्यासाठी चार उत्पादन हस्तांतरण करारांवर स्वाक्षरी केली आहे. या करारांमुळे भारताचे हवाई संरक्षण आणखी सक्षम होण्यास मदत होणार आहे.

भारतात हवाई दलाकडे ३६ राफेल लढाऊ विमानांचा ताफा कार्यरत आहे. या व्यतिरिक्त भारताने नौदलासाठी २६ मरीन राफेल लढाऊ विमानांचा ताफा खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. या सर्व विमानांची देखभाल दुरुस्ती सहजतेने करता यावी यासाठी भारताला राफेलच्या सुट्या भागांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासू शकते. भारत आणि फ्रान्स संयुक्तपणे देशातच राफेलची निर्मिती करण्याबाबत नियोजन करत आहेत. या प्रकल्पालाही सुट्या भागांच्या निर्मितीमुळे मोठी मदत होणार आहे. यामुळेच राफेलच्या सुट्या भागांबाबतच्या कराराला महत्त्व आहे. हैदराबादमध्ये उभारला जाणार असलेला कारखाना भारताच्या विमान उद्योगाला चालना देण्यास मदत करेल.

भागीदारी करारांतर्गत टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स हैदराबादमध्ये राफेलच्या प्रमुख स्ट्रक्चरल सेक्शन्सच्या निर्मितीसाठी एक अत्याधुनिक कारखाना उभारणार आहे. या कारखान्यात विमानाच्या मागील फ्यूजलेजचे पार्श्व कवच, संपूर्ण मागील भाग, मध्यवर्ती फ्यूजलेज आणि पुढचा भाग यांची निर्मिती केली जाईल. पहिला फ्यूजलेज प्रकल्प २०२८ पर्यंत कार्यरत होणार आहे. या कारखान्यामुळे दरमहा दोन पूर्ण फ्यूजलेज मिळतील.

हैदराबादच्या कारखान्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच, राफेल विमानांचे फ्यूजलेज फ्रान्सबाहेर तयार केले जातील. भारतातील पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी हे एक निर्णायक पाऊल आहे. भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने हैदराबादचा कारखाना महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व