विजय बंगळुरूचा, कमाई मात्र अंबानींची

मुंबई : IPL 2025 च्या फायनलमध्ये RCB (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) ने PBKS (पंजाब किंग्स) वर विजय मिळवला. RCB ने पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. आरसीबीची टीम किंग ठरली पण सर्वात जास्त पैसा कमावला तो मुकेश अंबानी यांनी.


IPL 2025 (इंडियन प्रीमियर लीग) चा अंतिम सामना तीन जून रोजी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळला गेला. विराट कोहलीसाठी यंदाचा सीजन खास आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची 18 वर्षांपासूनची प्रतिक्षा संपुष्टात आली. यंदाच्या सीजनमध्ये पहिल्यांदा RCB टीम चॅम्पियन ठरली. त्यांनी फायनलमध्ये पंजाब किंग्सवर सहा धावांनी विजय मिळवला. आरसीबी टीमने विजेतेपदाचा चषक पटकावला . पण IPL 2025 च्या फायनलने फक्त BCCI च नाही, तर जिओ हॉटस्टार या ब्रॉडकास्टरवर देखील पैशांचा पाऊस पाडला. यंदा ६४.३ कोटी प्रेक्षकांनी अंतिम सामना बघण्याचा आनंद लुटला. मागच्यावर्षी ६०.२ कोटी क्रिकेटप्रेमींनी जिओ सिनेमावर आयपीएलचा अंतिम सामना बघण्याचा आनंद लुटला होता. यंदा हा रेकॉर्ड मोडीत निघाला. आता जिओ सिनेमा आणि हॉटस्टारच मर्ज झालं आहे. त्यामुळे जिओ हॉटस्टरावर कोट्यवधी लोकांनी PBKS आणि RCB चा अंतिम सामना बघितला.



Royal Challengers Bengaluru आणि Punjab Kings यांच्यातील अंतिम सामन्यातून मुकेश अंबानी यांनी भरपूर पैसा कमावला. हॉटस्टार आणि जिओ सिनेमाच्या मर्जरनंतर जिओ हॉटस्टारमध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा ६३.१६ टक्के हिस्सा आहे. यात ४६.८२ टक्के वायकॉम १८ च्या माध्यमातून आणि १६.३४ टक्के डायरेक्ट हिस्सेदारी आहे.



किती हजार कोटींची कमाई?


आयपीएल मॅच दरम्यान दहा सेकंदाच्या जाहीरातीसाठी अठरा ते एकोणीस लाख रुपये चार्ज केले जातात. यावेळी त्यात वीस ते तीस टक्के वाढू होऊ शकते, असं आयपीएल सुरु होण्याआधी मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. मुकेश अंबानी आयपीएल सामन्यादरम्यान जाहीरातींच्या माध्यमातून सहा हजार कोटींची कमाई करु शकतात अशी आयपीएल सुरु होण्याआधी चर्चा होती.



कसा पैसा कमावतात?


मॅच पाहण्यासाठी लोक जिओ हॉटस्टारच सब्सक्रिप्शन विकत घेतात. त्यातून जिओ हॉटस्टारला पैसा मिळतो. सब्सक्रिप्शन प्लान्समधून रेवेन्यू वाढण्याचा थेट अर्थ हा आहे की, मुकेश अंबानी यांची घसघशीत कमाई. फक्त केवळ सब्सक्रिप्शन प्लान्स नाही, मॅचच्या लाइव स्ट्रीमिंग दरम्यान जाहिरातींमधून मुकेश अंबानी तगडी कमाई करतात.

Comments
Add Comment

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

दोन वर्षीय चिमुकलीवर गुन्हा दाखल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने येथे फटाके फोडण्याच्या वादातून काल दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी एका दोन

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

षटकारांचा राजा उपाधीपासून रोहित सहा पावले दूर

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित

अक्षया नाईकचं ओटीटीवर पदार्पण

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून घरघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. तिच्या सोशल मीडिया