शासकीय कार्यालयात विजेचा अनावश्यक वापर

बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी


मुंबई : शासकीय कार्यालयात विजेचा अनावश्यक वापर सुरू असून, बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या तसेच ऊर्जा विभागाच्या वतीने विजेची बचत करण्याचे आवाहन सर्वांना करण्यात येत असून सुद्धा अनेक शासकीय, महापालिका कार्यालयात वीज वाया घालण्याचे प्रकार निदर्शनास येत आहे. विजेची बचत करणे अधिकाऱ्यांची जबाबदार आहे. परंतु काही अधिकाऱ्यांकडून विजेची बचत होताना दिसत नसल्याने अशा अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे यांनी केली आहे.



भांडुप (प.) येथील मनपा एस विभागातील रस्ते अभियंता तसेच इमारत व कारखाने या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या केबिनमधील संबंधित अधिकारी जागेवर नसताना सुद्धा लाईट, पंखा चालू असल्याचे समोर आले असून कामानिमित्त व इतर ठिकाणी जाण्यापूर्वी लाईट, पंखा बंद करून विजेची बचत करायची सोडून, वीज वाया घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वराडे यांनी मनपा एस विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांच्याकडे केली  आहे.

Comments
Add Comment

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५