गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजा, धनंजय मुंडे एकत्र

११ वर्षांनंतर गोपीनाथगडावर भावनिक क्षण


परळी : भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते ‘लोकनेते’ गोपीनाथ मुंडे यांच्या ११व्या स्मृतिदिनानिमित्त परळी येथील गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमात राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः मुंडे कुटुंबातील दोन महत्वाचे चेहरे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे तब्बल ११ वर्षांनंतर गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनास एकत्र मंचावर आले. या कार्यक्रमात दोघांनीही हजेरी लावल्याने एक भावनिक क्षण अनुभवण्यास मिळाला. कार्यक्रमाच्या शेवटी बहीण-भाऊ एकत्रजेवण करत होते.


कार्यक्रमात बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, 'धनंजय यांनी मला सांगितले,‘आमच्यावतीने तूच बोल’, म्हणून आज मी तुमच्याशी संवाद साधत आहे.' त्यांनी पुढे सांगितले की, 'मी एकटी नाही, माझ्या पाठीशी तुम्ही सगळे उभे आहात. ही एक कुटुंब व्यवस्था आहे. दरवर्षी आम्ही कार्यक्रम करतो, पण प्रत्येकवेळी वाटतं की आणखी काहीतरी करावं.' रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर अशा सामाजिक उपक्रमांद्वारे गोपीनाथ मुंडेंचे विचार आणि कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. 'त्यांना जर रक्त लागलं असतं, तर आपण कमी पडलो नसतो. म्हणूनच आजही आम्ही लोकांसाठी रक्तदान करत आहोत,'असे त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या कार्याचा पुनःस्मरण करत त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला. 'मुंडे साहेब आज असते, तर देशाच्या मोठ्या पदावर असते, त्यांनी फार मोठं स्वप्न पाहिलं होतं आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांची धडपड होती,' असे त्यांनी स्पष्ट केले.


'तुम्ही त्यांना शोधता कुठे, मला माहीत नाही; पण मी त्यांना तुमच्यामध्ये शोधते,'अशा शब्दांत त्यांनी उपस्थित जनतेशी आत्मीयतेने संवाद साधला. तसेच बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, पांडवांना आणि रामाला देखील वनवास सहन करावा लागला होता, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण असे कीर्तनात ऐकले, असेही पुढे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी पंकजा मुंडे यांनी उपस्थित सर्व लोकांना 'दोन घास खाऊनच जा' असे सांगून जेवणासाठी आग्रह केला. विशेष म्हणजे, यावेळी पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी एकाच पंगतीत एकत्र जेवण केले. हा प्रसंग अनेक कार्यकर्त्यांना भावूक करणारा होता. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे या कार्यक्रमात उपस्थित होते. मात्र, त्यांनी भाषण न करता मौन राखले.

Comments
Add Comment

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल