म्हाडा दोन लाख वृक्षारोपण करणार!

मुंबई : जुलै महिन्यात देशात साजरा करण्यात येणाऱ्या वन महोत्सव सप्ताह निमित्त महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) तर्फे राज्यात सुमारे दोन लाख झाडांचे रोपण करण्यात येणार आहे. यापैकी सुमारे ५० हजार झाडे मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) क्षेत्रात लावण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली. म्हाडा मुंबई ५० हजार आणि म्हाडा कोकण विभाग २५ हजार वृक्षारोपण करणार आहे, असेही ते म्हणाले.

म्हाडाच्या राज्यातील विविध मंडळाच्या अखत्यारीत एक ते सात जुलै दरम्यान वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. जिथे बांधकाम किंवा कोणताही विकास करता येत नाही अशा भूखंडांवर प्रामुख्याने मियावाकी पद्धतीने घनदाट शहरी जंगले निर्माण करण्यासाठी वृक्षारोपण केले जाणार आहे. कमी जागेत अधिक झाडे लावून जैवविविधता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

म्हाडाचा जो विभाग वृक्षारोपण करेल, तोच विभाग संबंधित झाडाची दीर्घकाळ काळजी घेणार आहे. लागवड केल्या जाणाऱ्या सर्व झाडांना जिओ टॅग केले जाईल. म्हाडाच्या ज्या प्रकल्पांमध्ये झाडे तोडावी लागतील तिथे झाडांची पुनर्लागवड बंधनकारक करण्याबाबत एक परिपत्रक लवकरच जारी करण्यात येणार आहे. प्रारंभी सदर बाब फक्त मुंबईसाठी लागू असेल आणि नंतर इतर विभागीय मंडळांमध्येही हे लागू करण्यात येईल; असे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल म्हणाले.

पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती या म्हाडाच्या विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातही प्रत्येकी २५ हजार झाडे लावण्याचे आवाहन संजीव जयस्वाल यांनी केले आहे.

 
Comments
Add Comment

राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम

आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात? मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता

गरजू रुग्णांना उपचार नाकारल्यास कारवाई

मुंबई :राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे

आश्रमशाळेतील शिक्षकांनाही टीईटी बंधनकारक

आदिवासी विभागाकडून शासन निर्णय जारी दोन वर्षांत उत्तीर्ण न झाल्यास सेवासमाप्ती मुंबई : राज्यातील शाळांतील

अनिल परब यांनी राडा करूनही निकटवर्तीयाची उबाठातून हकालपट्टी

मुंबई : ज्या कार्यकर्त्याला तिकीट मिळवून देण्यासाठी अनिल परब यांनी मातोश्रीत मध्यरात्री राडा घातला होता, त्याची

बेस्ट सेवानिवृत्त कामगार अधिकाऱ्यांचे बुधवारी आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या

मानवी वस्तीत जेरबंद केलेला बिबट्या वनखात्याकडून अधिवासात रवाना

कांदिवली : भाईंदर पूर्वेला पारिजात सोसायटी मध्ये, शिरून ७ नागरिकांना जखमी केलेल्या, बिबट्याला वन विभागाने