EV Battery Station : आता फक्त २ मिनिटे! इलेक्ट्रिक वाहनांसाठी मेट्रो स्थानकांवर ईव्ही बॅटरी स्वॅपिंगची सुविधा

दहिसर स्थानकावर पहिला प्रकल्प कार्यान्वित


मुंबई : ई-वाहन चालकांसाठी आनंदची बातमी आहे. फ्लीट ऑपरेटर, डिलिव्हरी एजंट्स आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) ने मेट्रो आणि मोनोरेल स्थानकांवर इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी स्वॅपिंग स्टेशनची सुविधा सुरू करण्यात येणार असून, दहिसर पूर्व मेट्रो स्थानकावर या उपक्रमाचा पहिला प्रकल्प नुकताच कार्यान्वित करण्यात आला आहे. हा उपक्रम MMMOCLने होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया या जपानी कंपनीसोबत भागीदारीत सुरू केला आहे. या सुविधेमुळे ई-वाहनचालक केवळ दोन मिनिटांत चार्ज झालेली बॅटरी घेऊन पुढील प्रवास सुरू करू शकतील. या नव्या सेवेमुळे फ्लीट ऑपरेटर, डिलिव्हरी एजंट्स आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


या उपक्रमातून एमएमएमओसीएल ला सुमारे ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, ही सुविधा मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवेल आणि प्रदूषणविरहित नागरी जीवनशैलीस मदत करेल. महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी या योजनेचे कौतुक करताना सांगितले की, लवकरच मुंबईतील आणखी ३० ठिकाणी अशी बॅटरी स्वॅपिंग केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. ही सुविधा म्हणजे मुंबईच्या पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतुकीकडे टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.



नियोजित केलेले स्वॅपिंग स्टेशन्स


मेट्रो ७ मार्गिका 



गुंदवली, मोगरा, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, देवी पाडा, राष्ट्रीय उद्यान.



मेट्रो २अ मार्गिका 



दहिसर पूर्व, आनंद नगर, कांदरपाडा, एक्सर, बोरिवली पश्चिम, शिंपोली, कांदिवली पश्चिम, डहाणूकरवाडी, मालाड पश्चिम, लोअर मालाड, बांगूर नगर, ओशिवरा, लोअर ओशिवरा, अंधेरी पश्चिम.



मोनोरेल 


संत गाडगे महाराज चौक, मिंट कॉलनी, नायगाव, वडाळा, फर्टिलायझर टाऊनशिप, चेंबूर

Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील