मेट्रो, मोनोच्या स्थानकांलगत ई-स्वॅप बॅटरी स्टेशन्स सुरू होणार

मेट्रोचे मुंबईत हरित भविष्यासाठी महत्वपूर्ण पाऊल


मुंबई : जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना पर्यावरणस्नेही वाहतूक व हरित सार्वजनिक परिवहन सेवा अधिक चांगल्या करण्यात योगदान दिल्याचे आम्ही अभिमानाने सांगू शकतो. मुंबईभर पसरलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे.



या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. त्यामुळे, मुंबई हे सार्वजनिक परिवहन सेवेशी ईव्ही बॅटरी पायाभूत सुविधा जोडणारे भारतातील अग्रगण्य शहर ठरणार आहे. एमएमएमओसीएलच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत उचलण्यात आलेले हे एक मोठे पाऊल असून, पर्यावरणस्नेही ऊर्जा उपाययोजना आणि स्मार्ट लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीला चालना देण्यावर या धोरणामध्ये भर देण्यात आला आहे. एमएमआरडीएचे आयुक्त आणि महामुंबई मेट्रोचे अध्यक्ष, डॉ. संजय मुखर्जी (भाप्रसे) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमएमओसीएलच्या २९व्या संचालक मंडळाच्या बैठकीत हे धोरण मंजूर करण्यात आले. होंडाने त्यांची ई:स्वॅप सिस्टीम बसविण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रणालीद्वारे इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांचे वापरकर्ते त्यांच्या चार्ज संपलेल्या होंडा मोबाइल पॉवर पॅक ई: बॅटरीऐवजी दुसरी पूर्ण चार्ज केलेली बॅटरी केवळ दोन मिनिटांत घेऊ शकतात.


ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग मेट्रो ७ मार्गिका, मेट्रो २ए मार्गिका , मोनोरेल स्थानकादरम्यान असणार आहे. सर्व ठिकाणी इन्स्टॉलेशन करताना सुरक्षा, तांत्रिक आणि पर्यावरणासंदर्भातील निकषांचे काटेकोर पालन करण्यात येणार असून दररोज ईव्ही वापरणाऱ्यांसाठी, विशेषतः डिलिव्हरी एजंट्स आणि फ्लीट ऑपरेटर्ससाठी सोपा ॲक्सेस व वापरसुलभतेची खात्री करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून