‘धार्मिक स्थळे अधिकृत होण्यावर लवकरच निर्णय घेणार’

नवी मुंबई : नवी मुंबई शहर हे झपाट्याने विकासाच्या मार्गाने जात आहे. तसेच सन २०१४, २०१९ व २०२४ च्या दरम्यान आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये झालेल्या विकासकामांच्या जोरावर सलग ३ वेळा बेलापूर मतदार संघावर वर्चस्व ठेवणाऱ्या त्या पहिल्या आमदार ठरल्या आहेत. त्याच अनुषंगाने आज सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या समवेत आमदार मंदा म्हात्रे यांची बेलापूर मतदार संघातील विविध प्रश्नांवर बैठक झाली. तसेच प्रलंबित असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेवक माजी परिवहन समिती सदस्य काशिनाथ पाटील, कमळ शर्मा, हरिश्चंद्र घरत, सुरेश पाटील, जगदीश मढवी, मणक्या मढवी, चंदू भोईर व मंदिराचे विश्वस्त व सदस्य उपस्थित होते.


सदर बैठकीमध्ये नवी मुंबईमध्ये होत असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्प संदर्भात आढावा घेतला. तसेच बेलापूर, सीवूड्स, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, तुर्भे, वाशी येथील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. महिला बाल भवनाची निविदा पूर्ण झाली असून उर्वरित प्रक्रिया करणे, नवी मुंबईतील सर्व धार्मिक स्थळांचे भूखंड धार्मिक स्थळांच्या दराप्रमाणे संस्थेच्या नावावर करणे व नवीन जे काही छोटे भूखंड आहेत ते धार्मिक स्थळांसाठी आरक्षित ठेवणे त्याचबरोबर धार्मिक स्थळांचा सर्व्हे करून एक पॉलिसी तयार करण्यात येणार असून धार्मिक स्थळे कशी अधिकृत होतील असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येत असल्याचे सिडको उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी सांगितले. असे अनेक प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केल्यानंतर, या सर्व प्रश्नांवर सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सकारात्मकता दाखवत सदर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येणार असल्याचे  सांगितले.

Comments
Add Comment

Navi Mumbai Airport Passenger Test : २५ डिसेंबरला नवी मुंबईतून पहिले उड्डाण! पॅसेंजर सिम्युलेशन टेस्ट यशस्वी; विमानतळ सेवेसाठी सज्ज

नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport) उद्घाटनानंतरची सर्वात मोठी बातमी समोर आली

नवी मुंबईत सिडकोच्या ४ हजार ५०८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध

नवी मुंबई  : सिडकोच्या इतिहासात प्रथमच ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर ४ हजार ५०८ घरांची

नवी मुंबईत वर्षभर वाहतुकीत बदल

खारघर-तुर्भे लिंक रोड भूमिगत बोगदा प्रकल्पाचे काम सुरू नवी मुंबई : सिडकोच्या भूमिगत खारघर-तुर्भे लिंक रोड

२५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरून इंडिगो आणि अकासा विमानसेवा सुरू

मुंबई : २५ डिसेंबर रोजी नवी मुंबईच्या विमान तळावरून प्रत्यक्षात पहिले व्यवसायिक विमान उड्डाण घेणार आहे. शिवाय

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

आळंदीला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला, कंटेनर दिडींत घुसल्याने महिला किर्तनकाराचा मृत्यू!

आळंदी: आळंदीला पायी निघालेल्या दिंडीमध्ये कंटेनर ट्रेलर घुसल्याने झालेल्या अपघातात उरण येथील कीर्तनकार मंजुळा